राष्ट्रवादीत मोठ्या संख्येने घर वापसी होणार, धनंजय मुंडे यांची माहिती!

राष्ट्रवादीत मोठ्या संख्येने घर वापसी होणार, धनंजय मुंडे यांची माहिती!

पंढरपूर – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत मोठ्या संख्येने घर वापसी होणार असल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी दिली आहे. लाटेत आलेले सरकार आणि लाटेत आलेले आमदार-खासदार परत निवडून येत नसतात. हा इतिहास माहीत असल्याने चार राज्यांच्या निवडणुकांचा निकाल लागताच 12 तारखेपासून राष्ट्रवादीमध्ये मोठी घरवापसी सुरु होईल, असे संकेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिले आहेत. तेपंढरपुरात बोलत होते.

दरम्यान 11 डिसेंबरला पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल हाती येताच अनेकांच्या पायाखालची वाळू सरकेल. त्यानंतर लाटेत आलेली मंडळी घरवापसीच्या तयारीला लागतील, असा टोला धनंजय मुंडेंनी लगावला आहे.

तसेच यावेळी बोलत असताना शिवसेनेच्या कोणत्याही वक्तव्याला शाळकरी मुलेही गांभीर्याने घेत नाहीत. अयोध्येला गेलेले ठाकरे हात हलवत परत आले. शिवसेना सत्तेसाठी लाचार असल्यानेच पाच वर्ष मंत्रिपदावर खुश आहे. सेना-भाजप राज्यातील दुष्काळासारखे गंभीर प्रश्नावरील लक्ष हटविण्यासाठी भांडायचे नाटक करीत असल्याचा आरोपही यावेळी धनंजय मुंडे यानी केला आहे.

दुष्काळात जनतेला आधार देण्याऐवजी दुष्काळात तुमची जनावरे नातेवाईकांकडे नेऊन घाला, असा बेजबाबदार सल्ला देणाऱ्या मंत्र्यांच्या घरी शेतकऱ्यांनी खरोखरच आपली जनावरे नेऊन घालावीत. मी ही माझ्या घरची 5 जनावरे मुख्यमंत्र्यांच्या घरी वर्षा वर नेऊन घालणार असल्याचं विधान धनंजय मुंडे यांनी केलं.

राज्यात सध्या पाणीवाटपावरून रोज हाणामाऱ्या समोर येऊ लागल्या आहेत. सत्ताधाऱ्यांना अनुभवच नसल्याने पाणी कसे वाटायचे हे त्यांना समाजत नसल्याने राज्यभर पाण्यावरुन वाद सुरु झाल्याचा आरोप मुंडेंनी केला. सध्या दुष्काळाच्या फटक्यामुळे हजारोंच्या संख्येने ग्रामीण भागातील दुष्काळी जनता शहराकडे येऊ लागली आहे. त्यामुळे दुष्काळाचा मोठा फटका शहरांनाही बसेल, अशी भीती धनंजय मुंडेंनी व्यक्त केली आहे.

COMMENTS