बीड – विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी शेरोशायरीद्वारे आपल्या विरोधकांना टोला लगावला आहे. तुम लाख कोशीश करो, मुझे बदनाम करने की, मै जब जब बिखरा हूं…. दुगणी रफ्तार से निखरा हूं… असं धनंजय मुंडे यांनी परळी येथील कार्यक्रमात हा टोला लगावला आहे.
तुम लाख कोशीश करो,
मुझे बदनाम करने की,मै जब जब बिखरा हूं….
दुगणी रफ्तार से निखरा हूं… pic.twitter.com/QKA35MtzkE— Dhananjay Munde (@dhananjay_munde) September 14, 2018
दरम्यान धनंजय मुंडे यांना जगमित्र नागा सूतगिरणी प्रकरणी तारण असणाऱ्या मालमत्ता विक्री अथवा खरेदी करता येणार नसल्याचा आदेश अंबाजोगाई सत्र न्यायालयाने दिला आहे. तसेच मुंडे यांच्यासह इतर आठ जणांच्या मामत्तेवर न्यायालयानं टाच आणली आहे. परंतु ही कारवाई केवळ सूडबुद्धीने केली असून 18 पैकी फक्त सात संचालकांवर कारवाई करण्यात आली असल्याचा आरोप मुंडे यांनी गृहमंत्र्यांवर केला आहे.
दरम्यान बीड जिल्हा बँकेचे कर्ज प्रकरण हे 1999 मधील असून मी 2006 मध्ये सूतगिरणीवर संचालक झालो. तसेच गृहमंत्र्यांनी माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला असून आम्हाला आमचं म्हणणं सादर करण्याची संधीही दिली नसल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे.
तसेच काल परळी शहरातल्या वैद्यनाथ सार्वजनिक गणेश महोत्सवाच्या उद्घाटन धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाषणादरम्यान मुंडे यांनी आपल्या विरोधकांना शेरोशायरीद्वारे हा टोला लगावला आहे.
COMMENTS