परळी – राज्याच्या सामाजिक न्याय मंत्रीपदाचा पदभार सांभाळल्यानंतर धनंजय मुंडे यांनी आज पहिल्यांदाच प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले. प्रभू वैद्यनाथाच्या चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतले. दर्शन घेतल्यानंतर आज खऱ्या अर्थाने कामाची सुरुवात झाली अशी भावना त्यांनी व्यक्त केली. जेव्हा प्रभू वैद्यनाथाच्या चरणी नतमस्तक झालो तेव्हा या मंदिराचे नाव देशभर होवो ही इच्छा प्रकट केली. माझ्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत प्रभू वैद्यनाथ मंदिराला ज्योतिर्लिंगाचा दर्जा प्राप्त करून देण्याचा प्रयत्न करेन. त्यासाठी हायकोर्टात जावं लागलं तरी चालेल असा निर्धार त्यांनी देवल कमिटीच्या वतीने आयोजित छोटेखानी सत्काराला उत्तर देताना बोलून दाखवला.
पर्यटनाच्या दृष्टीने परळीचे नाव मोठे करणे हे माझे स्वप्न आहे. त्यासाठीच या तीर्थ क्षेत्राचा विकास करणे महत्त्वाचे आहे. या उपक्रमासाठी किती ही निधी लागला तरी चालेल प्रसंगी केंद्रात जावू पण या तीर्थक्षेत्राचा विकास केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.
पूर्वीचा विकास आराखडा 133 कोटींचा असला तरी प्रत्यक्षात त्याला दहा कोटी मिळाले होते मात्र या विकास आराखड्यात चा पुनर्विचार करून पुन्हा नव्याने विकास आराखडा तयार केला जाईल हे काम तीन महिन्याच्या आत पूर्ण करण्याचा मनोदयही त्यांनी यावेळी बोलून दाखवला.
यावेळी तहसीलदार कमिटीचे अध्यक्ष पाटील , सचिव राजेश देशमुख, विश्वस्त विजयकुमार मेनकुदळे, अनिल तांदळे, प्राध्यापक शरद मोहरिर, डॉ. गुरूप्रसाद देशपांडे, प्रा. बाबासाहेब देशमुख, प्रा. प्रदीप देशमुख, नागनाथराव देशमुख, जि. प. सदस्य अजय शेठ मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, माजी शहराध्यक्ष चंदुलाल बियाणी , राजेश्वर आबा चव्हाण, गोविंदराव देशमुख, अभय मुंडे, नंदकिशोर तोतला, डॉक्टर मधुसूदन काळे, सुरेश टाक, विजयप्रकाश लड्डा, राजेंद्र सोनी, शिवकुमार सोनी आदी उपस्थित होते. वैजनाथ मंदिर परिसरातील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांनी अभिवादन केले.
जिजाऊंना वंदन
राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त परळी शहरातील जिजामाता उद्यानात जाऊन आमदार धनंजय मुंडे यांनी जिजाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
COMMENTS