परळीत महिला भवन उभारणार, महिला बचत गटांना नाथ प्रतिष्ठानतर्फे सहकार्य करणार – धनंजय मुंडे

परळीत महिला भवन उभारणार, महिला बचत गटांना नाथ प्रतिष्ठानतर्फे सहकार्य करणार – धनंजय मुंडे

परळी – परळी शहरात महिला बचत गटाच्या माध्यमातुन महिला भगीनींचे सक्षमीकरण करण्यासाठी यापुढे नाथ प्रतिष्ठान सक्रिय सहभाग घेणार असून नगर परिषदेच्या वतीने शहरात महिला भवन उभारण्याची घोषणा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली.

नगर परिषदेच्या वतीने परळी शहरातील 22 महिला बचत गटांना प्रत्येकी 10 हजार याप्रमाणे 2 लाख 20 हजार 3 वस्तीस्तर संस्थांना प्रत्येकी 50 हजार रूपयांचा फिरता निधी आज कै.लोकनेते गोपिनाथराव मुंडे नटराज रंग मंदिरात झालेल्या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या हस्ते वितरीत करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

महिला बचत गटांना कर्जासाठी व इतर बाबींसाठी येणार्‍या अडचणी सोडवण्यासाठी यापुढे आपले नाथ प्रतिष्ठान सक्रिय कार्य करणार आहे. याशिवाय चांगले काम करणार्‍या महिला बचत गटांना आर्थिक सहकार्य करण्याची घोषणाही त्यांनी केली. महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाच्या विक्रीसाठी कायमस्वरूपी दुकाने उपलब्ध करून देण्याचीही घोषणा त्यांनी केली.

*पाणी टंचाईसाठी सत्ताधार्‍यांनी काय केले*

शहराला पाणी पुरवठा करणारे वाण धरण कोरडे पडल्याने पाणी टंचाई जाणवत असली तरी नगर परिषदेने शर्थीचे प्रयत्न करून शहराला पाणी टंचाई जाणवु दिली नाही. नाथ प्रतिष्ठानचे तसेच अनेक नगरसेवकांचे स्वतःच्या टँकरद्वारे आम्ही पाणी पुरवठा केला. नगर परिषदेला प्रतिष्ठानने 15 लाख रूपयांची मदत केली. मात्र सत्ताधारी असणार्‍या भाजपच्या लोकप्रतिनिधींनी परळीच्या पाण्यासाठी पाणी वाटपाचा शो करण्याशिवाय दुसरे काय केले. असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ.सरोजनीताई हालगे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी, उपनगराध्यक्ष अयुबभाई पठाण, जिल्हा परिषद सदस्य अजय मुंडे, पाणी पुरवठा सभापती सौ.प्राजक्ता भावड्या कराड, नगरसेवक गोपाळ आंधळे, विजय भोयटे, संजय फड, भावड्या कराड, शेख शम्मो, नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे, संतोष रोडे आदी उपस्थित होते. याप्रसंगी सौ.हालगे,धर्माधिकारी,अयुबभाई पठाण, गोपाळ आंधळे, संजय फड यांनी मनोगत व्यक्त केले.

*नटराज रंग मंदिर परिसरातीत महिला बचत गटांच्या उत्पादित स्टॉलला ना.धनंजय मुंडे यांनी भेट देऊन त्यांच्या वस्तुंची खरेदीही केली.*

दरम्यान यावेळी ना.धनंजय मुंडे यांनी बचत गटाचे उत्कृष्ट कार्य करणार्‍या कौसरबी इनामदार, मुन्नीबाजी (शेख जाकीर अहमद) यांचा सत्कार केला.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सतिश खंबाळे यांनी सुत्रसंचलन वैशाली रूईकर यांनी तर आभार प्रदर्शन नेहरकर मॅडम यांनी मांडले. यावेळी सय्यद फेरोज, बळीराम नागरगोजे, जयदत्त नरवटे, चंदु हालगे, संग्राम गित्ते, युनुसभाई डिघोळकर, सय्यद अल्लाउद्दीन, मुक्तारभाई, शेख मैनोद्दिन, अथर खतीब, आकाश डोंगरे हे ही उपस्थित होते.

COMMENTS