परळीच्या पाणी टंचाईस पंकजाताईच जबाबदार, धनंजय मुंडेंचा आरोप!

परळीच्या पाणी टंचाईस पंकजाताईच जबाबदार, धनंजय मुंडेंचा आरोप!

बीड, परळी – परळीच्या भाजपा आमदारांनी स्वतःच्या वैद्यनाथ साखर कारखान्याला वाण धरणातुन अमर्यादित पाणी घेतल्यामुळेच परळी शहराला पाण्याची टंचाई भासत असून पाण्याअभावी परळीकरांच्या होणाऱ्या हालअपेष्टांना त्याच जबाबदार आहेत असा आरोप विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.

माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते आ. अजितदादा पवार व धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त परळीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने १५ ते २२ जुलै विविध सामाजिक व लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. या अंतर्गत आज दि.१९जुलै रोजी लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिर येथे वाॅटर व्हिलर  वितरण समारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते.

स्वतःच्या वैद्यनाथ कारखान्याला परळीचे पाणी घेतले मात्र शेतकऱ्यांना ऊसाचे पैसे दिले नाहीत आणि परळीकरांचे पाणीही पळवले असा आरोप करून नगरपालिकेच्या टँकरने पाणीपुरवठा वाटप करण्यापेक्षा पालकमंत्री आणि या भागाच्या आमदार म्हणून परळीतल्या जनतेला पाणी देण्यासाठी त्यांनी काय केले असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

वान धरण कोरडे पडले असतानाही नगरपालिका 80 टँकरने पाणीपुरवठा करत आहे. आपण स्वतः नाथ प्रतिष्ठानच्यावतीने पंधरा लाख रुपये नगरपालिकेला दिले, नाथ प्रतिष्ठान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक स्वखर्चाने पाणीपुरवठा करत आहेत याचा आपल्याला अभिमान वाटतो असेही मुंडे म्हणाले.

समाजातील प्रत्येक घटकांचे जीवन प्रकाशमान करण्यासाठी माझे सहकारी सातत्याने आधार देतात याचा आनंद वाटतो असे सांगून वाॅटर व्हिलर वितरणाचा उपक्रम घेण्याची वेळ येउ नये परंतु भीषण पाणी संकटच इतके झाले आहे की सर्वच जलसाठे संपले आहेत. या परिस्थितीत पाणी वाहून आणण्यासाठीचा आपल्या डोक्यावरील भार वाॅटर व्हिलर वितरण करुन कमी करण्याचा प्रयत्न आहे. परळी शहराला खडका बंधाऱ्यातून पाणी पुरवठा करण्यासंदर्भात सातत्याने आपण सरकारकडे पाठपुरावा केला असून हे पाणी आपल्याला लवकरच उपलब्ध होईल असे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी प्रास्ताविकातून आधार महोत्सवातील विविध सामाजिक व लोकोपयोगी उपक्रमांची माहिती दिली.

काय आहे वॉटर व्हीलर

वॉटर व्हीलर ज्यामध्ये तीन घागरी पाणी साठवले जाते आणि पन्नास लिटर पाणी अगदी अलगद ढकलत घरापर्यंत आणले जाते. पाणीटंचाई परिस्थितीचा विचार करता वाॅटर व्हिलर निश्चितच उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी बाजीराव भैय्या धर्माधिकारी, उपनगराध्यक्ष अय्युबभाई पठाण, नगरसेवक  शरद मुंडे, महादेव रोडे शंकर आडेपवार, विजय भोयटे,  गोपाळ आंधळे, बाळूशेठ लड्डा, सुरेश अण्णा टाक, डी.एस.राठोड सर , अजीज भाई कच्छी, वैजनाथ बागवाले, रवी मुळे, शकील कच्छी, प्रितम जाधव,सौ. अण्णपूर्णा जाधव,  महिला आघाडी शहराध्यक्ष अर्चना रोडे,पल्लवीताई भोईटे, युवती तालुकाध्यक्ष सुलभाताई साळवे, वैशालीताई तिडके, युवक तालुकाध्यक्ष संतोष शिंदे, सरचिटणीस अनंत इंगळे, सचिनु मराठे, राज हजारे, सुरेश नानवटे, धोंडीराम धोत्रे, दिनेश गजमल, राष्ट्रवादी युवकचे सरचिटणीस बळीराम नागरगोजे, रामेश्वर महाराज कोकाटे, कौठळी तांडाचे माजी सरपंच साहेबराव चव्हाण, वाणटाकळीतांडा सरपंच विनायक राठोड, कौडगाव हुडातांडा सरपंच सुभाष राठोड, डाबीतांडा सरपंच पंडित जाधव, लेंडेवाडीतांडा सरपंच सचिन चव्हाण, ग्रा.पं सदस्य कुंडलिक जाधव, सुग्रीव पवार, अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष अल्ताफ पठाण, तक्की खान, मेहबूब कुरेशी, नाजेर हुसेन ,जावेद कुरेशी, गफार काकर, शशी बिराजदार तौफिक कच्छी, फेरोजभाई, के.डी. उपाडे, रमेश मस्के, सेवादल तालुका अध्यक्ष लाला पठाण, शेख मुक्तार,शरद कावरे,  शेख हसन, बाळू वाघ, धम्मा अवचारे, ज्ञानेश्वर होळंबे, प्रदीप जाधवर, शरद चव्हाण, सचिन मराठे, खमरुद्दीनभाई, राहुल जगतकर, सतीश गंजेवार, राज जगतकर, प्रताप समिंदरसवळे, बबलु साळवे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनंत इंगळे यांनी प्रास्ताविक केले.

COMMENTS