सांगली – राष्ट्रवादी काँग्रेसची हल्लाबोल यात्रा सांगलीतील तासगावमध्ये पोहचली आहे. तासगावमध्ये घेण्यात आलेल्या सभेत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. यावेळी बोलत असताना मुंडे यांनी भाषणाची सुरुवात गल्लीपासून करू की दिल्लीपासून हेच कळत नाही. यांच्या राज्यात दिल्लीसह गल्लीही धगधगती आहे. पेट्रोल-डिझेलचे भाव प्रचंड वाढले आहेत. त्यामुळे मोदीजी तुम्ही लोकांच्या पैशांवर जग फिरतात, किमान जनतेला जिल्ह्यात तरी फिरू द्या असं वक्तव्य मुंडे यांनी केलं आहे.
भाषणाची सुरुवात गल्लीपासून करू की दिल्लीपासून हेच कळत नाही. यांच्या राज्यात दिल्लीसह गल्लीही धगधगती आहे. पेट्रोल-डिझेलचे भाव प्रचंड वाढले आहे. मोदीजी लोकांच्या पैशांवर जग फिरतात. किमान जनतेला जिल्ह्यात तरी फिरू द्या. – आ. @dhananjay_munde#तासगाव #HallaBol pic.twitter.com/fJOx1g0OGc
— NCP (@NCPspeaks) April 5, 2018
दरम्यान तासगावमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसाला मारहाण केली. ही मस्ती आम्हाला दाखवू नका, आम्ही सुसंस्कृत राजकारण करतो, म्हणून शांत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या दादागिरीला घाबरणार नाही. आज जर आबा असते तर हे सरकार कधीच गेले असतं असंही धनंजय मुंडे यांनी यावेळी म्हटलं आहे. तसेच पंतप्रधानांनी २०१६ ला नोटाबंदी करून जनतेला झटका दिला. गरिबांना वाटलं की मोदी श्रीमंतांचे पैसे काढून आपल्याला देतील.परंत याचा फटका तर गरीब जनतेलाच बसला. देशात असंख्य प्रश्न आहेत त्यांचे उत्तर शोधण्यापेक्षा नवीन प्रश्न निर्माण करण्यात यांना रस असल्याची जोरदार टीकाही यावेळी मुंडे यांनी केली आहे.
COMMENTS