वर्धा – विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. विरोधी पक्षनेता तोडपाणी करणारा असता तर तुमच्या सरकारचे घोटाळे बाहेर काढला नसते. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात तुम्ही सरकारमध्ये आहात, तेव्हा चौकशी समिती नेमावी. जनाची नाही तर मनाची ठेवावी आणि शेतकऱ्यांचे पैसे देण्यासाठी आईची जमीन गहाण ठेवण्यापेक्षा चिक्की खाल्लेले पैसे दिले तर बरं होईल. तुम्ही चिक्कीत 200 कोटी खाल्ले. 110 कोटींच्या फोनमध्ये 70 कोटी खाल्ल्याचा आरोप धनंजय मुंडेंनी केला. ते वर्धा येथील सभेत बोलत होते.
धनंजय मुंडे हे तोडपाणी करणारे नेते आहेत,दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे साहेब जेव्हा विरोधी पक्षनेते होते तेव्हा त्यांनी सत्तेतल्या सरकारला जेरीस आणलं होतं. पण आत्ताचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे एकीकडे मंत्र्यांच्या विरोधात लक्षवेधी लावतात आणि दुसरीकडे सेटिंग करतात. तोडपाणी करणारे हे गोपीनाथ मुंडेंचे वारस होऊ शकत नाहीत, असा घणाघात मंत्री पंकजा मुंडे यांनी केला होता. त्यावर धनंजय यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
COMMENTS