विधान परिषदेत पहिल्याच दिवशी सरकारवर दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ !

विधान परिषदेत पहिल्याच दिवशी सरकारवर दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ !

मुंबई – विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. आजच्या पहिल्याच दिवशी राज्यातील विविध प्रश्नांवर विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला आहे. विधान परिषदेत पहिल्याच दिवशी सरकारवर दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ आली आहे. माजी विरोधी पक्षनेते माधवराव गायकवाड यांच्या निधनानंतर त्यांना शासकीय इतमामाम अंत्यसंस्कार करण्यात आले नसल्याबाबत धनंजय मुंडे यांनी विषय उपस्थित केला केला. यावरुन त्यांनी सरकारला धारेवर धरले आहे.

दरम्यान कॉम्रेड माधवराव गायकवाड यांचे निधन झाले, ते विधानपरिषदचे पहिले विरोधी पक्षनेते होते.त्यांचे निधन झाल्यावर 30 तास याची माहिती विधिमंडळ प्रशासनला नव्हती. उलट नंतर संबंधितांच्या कुटुंबियांशी संपर्क करून 2- 3 तास थांबा असं सांगण्यात आलं. हा कुटूंबियांचा, जनतेचा अपमान असल्याचं मुंडे यांनी म्हटलं आहे. तसेच याबाबत सरकारने दिलगिरी व्यक्त केली पाहिजे. तसेच संबंधित अधिकारी यांना निलंबित केले पाहिजे सरकारने माफी मागावी आणि दोषींवर कारवाई करावी अशी मागणी यावेळी मुंडे यांनी सभागृहात केली आहे.

धनंजय मुंडे यांनी केलेल्या मागणीनंतर सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच चौकशी अहवाल आजच सभागृहात ठेवणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी यावेळी म्हटलं आहे. त्यामुळे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारवर दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ आली आहे.

COMMENTS