मुंबई – राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना पत्र लिहिलं आहे. यामध्ये मुंडे यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष बंद करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील हजारो रुग्णांना शासनाकडून मिळणारी वैद्यकीय मदत बंद झाली आहे. मा. राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी याबाबत दखल घेत रुग्णांना मदत देण्याबाबत निर्देश द्यावेत ही विनंती केली आहे.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष बंद झाल्या संदर्भातील पत्र मी मा. राज्यपालांना लिहिले आहे. मा. राज्यपाल महोदय या पत्राची दखल घेत हजारो गरीब रुग्णांना दिलासा देतीलच अशी अपेक्षा धनंजय मुंडे यांनी या पत्रात व्यक्त केली आहे.
COMMENTS