‘ती’ सूत्रे पडणार तोंडघशी, धनंजय मुंडेंना मिळणार ‘हे’ वजनदार खाते…

‘ती’ सूत्रे पडणार तोंडघशी, धनंजय मुंडेंना मिळणार ‘हे’ वजनदार खाते…

मुंबई – महा विकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लांबल्याने सोशल मीडियासह विविध माध्यमांमध्ये सध्या ‘सूत्र’ या शब्दाचा आधार घेऊन नवनवे खाते वाटप सुरू असून दर तासाला ते बदलतही आहे. त्यामध्ये सर्वात जास्त चर्चेचा विषय ठरला आहे धनंजय मुंडे यांच्या मंत्री पदाबाबतचा! काही ‘सूत्रांनी’ सोशल मीडियावरच मंत्रीमंडळ विस्तार करून टाकला असून तासागणिक मंत्री व पक्षांचे प्रदेशाध्यक्ष पद विविध नेत्यांना बहाल केले आहे.

अनेक माध्यमांनी धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादी कडून मंत्री पदाऐवजी प्रदेशाध्यक्ष किंवा अन्य तत्सम जबाबदारी मिळण्याबाबत ‘सूत्रांच्या’ हवाल्याने वृत्त दिले आहेत, त्याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर व मुंडे यांच्या समर्थकांमध्ये रंगलेली दिसत आहे. परंतु या सर्व सूत्राना तोंडावर पाडणारे खात्रीशीर वृत्त आहे! महा विकास आघाडीच्या मंत्रिमंडळात धनंजय मुंडे हे कॅबिनेट मंत्री म्हणूनच असणार आहेत, तसेच त्यांना अत्यंत महत्वाचे खाते दिले जाणार आहे.

2014 ते 19 या राष्ट्रवादीच्या अत्यंत पडत्या काळात मुंडे हे पक्षासाठी सर्वात प्रभावी व आक्रमक अस्त्र ठरलेले आहेत. 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत कायम भाजपचा गड राहिलेल्या परळी विधानसभेत त्यांनी बहीण व माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा विक्रमी मतांनी पराभव केलेला आहे. तसेच 22 हून अधिक आमदारांच्या विजयासाठी निर्णायक सभा घेतलेल्या आहेत. एका प्रभावी वक्त्यासह दूरदृष्टी व अभ्यासू वृत्ती असलेले मुंडे हे राज्यात विरोधीपक्षनेते पदी ज्याप्रमाणे प्रभावी कामगिरीने महाराष्ट्राला कळले त्याचप्रमाणे मंत्रीपदही भूषवतील असा विश्वास पक्ष नेतृत्वास आहे. त्यामुळे मंत्रिपदाला ‘काटा’ वगैरे हे वृत्त तथ्यहीन आहेत, असे पक्षातील एका ज्येष्ठ नेत्यांनी सांगितले.

दरम्यान सध्या जयंत पाटील यांच्याकडे सोपविण्यात आलेले अर्थ व नियोजन तसेच जलसंपदा यांपैकी एका खात्यावर धनंजय मुंडे यांचे नाव निश्चित असल्याचेही ‘त्या’ नेत्यांनी सांगितले. तेव्हा येत्या 30 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होईल तेव्हा ही ‘सूत्रे’ पुन्हा एकदा तोंडावर पडणार हे आता निश्चित आहे!

COMMENTS