कर्जत – “अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आलेले असताना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरेंच्या उत्कृष्ट आणि परखड भाषणासाठी अभिनंदन! समाजाच्या जाणीवा सजग ठेवणारे हे भाषण मराठी साहित्य इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदले जाईल हे निश्चित!” असे ट्विट करून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केल. परिवर्तन यात्रेच्या व्यस्ततेसुद्धा आपले चौफेर लक्ष असते हे दाखवून दिले.
डॉ. अरुणा ढेरेंनी त्यांच्या भाषणात ‘सरकार आणि समाज’ दोघांनाही ज्या परखडपणे आपापल्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून दिली. जेष्ठ साहित्यीका नयनतारा सेहगल यांच्या ‘निमंत्रण वापसी’ प्रकरणी घेतलेली कणखर भूमिका ही कौतुकास्पद आहे.
अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आलेले असताना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरेंच्या उत्कृष्ट आणि परखड भाषणासाठी अभिनंदन!
समाजाच्या जाणीवा सजग ठेवणारे हे भाषण मराठी साहित्य इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदले जाईल हे निश्चित!#साहित्यसंमेलन pic.twitter.com/1CsH2Pam3x
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) January 11, 2019
तसेच “आम्हा बायकांच्या जगण्याचा मर्दाणी संघर्ष नाही दिसला… बाई सोयीले असते. बोलणारी बाई नाही चालत, डोलणारी अन् डोलवणारी पाह्यजे असते.” असे प्रतिपादन करणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात वैशाली येडे या शेतकरी विधवा पत्नीच्या भाषणाने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची व्यथेने हृदय पिळवटून निघाले. आता तरी सरकारला जाग येईल का? असा प्रश्न मुंडेंनी उपस्थित केला.
स्वतः उत्कृष्ट वाचक आणि साहित्याची आवड असलेल्या धनंजय मुंडेंनी परिवर्तन यात्रेच्या व्यस्ततेत आवर्जून साहित्य संमेलनातील घडामोडींवर लक्ष ठेऊन आहेत हे विशेष!
COMMENTS