पाटोदा – बजरंग बप्पा सोनवणे यांच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली आहे, आमचा विश्वास आहे की, आमचा हा उमेदवार मॅच विनर असेल, असा शंखनाद करत विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी बीड लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ केला. बीड लोकसभा निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या तालुकानिहाय बैठकांना आज पाटोदा येथून सुरूवात झाली. पाटोदा नंतर आष्टी आणि रात्री शिरूर येथील बैठकीमधूनही कार्यकर्त्यांनी प्रचंड उत्साहात उपस्थित राहत निवडणुकीच्या प्रचाराचा एक प्रकारे आरंभ केला.
दबंग होता तर प्रकल्प लातूरला का गेला ?- धनंजय मुंडे
या बैठकीत बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, बीडच्या जनतेने एका घराला भरपूर दिले मात्र बीडकरांना काय मिळाले ? 5 पाच वर्षात एकदाही न दिसलेल्या खासदाराचा निधीही खर्च करू शकल्या नाहीत तर त्या दबंग कशा ? दबंगाई होती तर 10 हजार कोटींचा प्रकल्प लातूरला जाऊच का दिला ? म्हणुनच आता सामान्य कुुटुंबात आणि शेतकर्यांशी नाळ जोडलेला व्यक्तीच खासदार होणार असा विश्वास व्यक्त केला.
या बैठकीय गुलाबराव घुमरे, जयसिंग सोळंके, अॅड.एन.एल. जाधव, अप्पासाहेब राख, जुबेरभाई चाऊस, बाबासाहेब शिंदे, इक्बाल पेंटर, कॉ.महोदव नागरगोजे, शिवभूषण जाधव, गणेश कवडे, दादासाहेब मुंडे, श्रीहरी पवार, गणेश भोसले, काकासाहेब शिंदे, शिवाजी पवार, सुनिल काळे, विठ्ठल सानप, सुवर्णाताई शिंदे आदी उपस्थित होते.
COMMENTS