बीड – कोरोना विषाणू संसर्गामुळे लॉकडाऊन ११वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी जिल्हा परिषद, अभिनव आयटी सोलुशन आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांनी तयार केलेले इझीटेस्ट (eZeeTest) हे मोफत ई लर्निंग ॲपचा उपक्रम प्रेरणादायी व कौतुकास पात्र आहे असे उद्गार पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी काढले.
जिल्हा प्रशासन व मिलीया महाविद्यालय यांच्यावतीने आज आज या उपक्रमाचा शुभारंभ पालकमंत्री मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमास जिल्हाधिकारी राहुल रेखावार व व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी उपस्थित शिक्षक वृंद व शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींना त्यांनी मार्गदर्शन केले.
पालकमंत्री म्हणाले सध्या जगापुढे आरोग्य संकट उभा आहे अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी सुरू करण्यात येत असलेला हा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरतो आहे हा उपक्रम पूर्ण होण्यासाठी अभिनव आयटी सोल्युशन व मिली या महाविद्यालयाचे प्रशासनाला सहकार्य मिळाले आहे याचा मला आनंद होत असून हे ॲप मोफत उपलब्ध होत असल्याने 11 व बारावी वीच्या विद्यार्थ्यांनी त्याचा उपयोग करावा असे मी आवाहन करतो ते पुढे म्हणाले, अभिनव आयटी सोल्युशन कोरोना संसर्गाच्या सर्वे व व नागरिकांची माहिती एकत्रित करावयासाठी प्रशासनाला लागणाऱ्या महत्त्वपूर्ण अॅप मोफत उपलब्ध करून दिले आहे त्याचा उपयोग मोठ्या प्रमाणात तयार होत असलेल्या माहितीच्या विश्लेषणासाठी प्रशासनास झाला आहे कोरोनाच्या संकटात प्रत्येक अधिकारी-कर्मचारी मग ते आरोग्य यंत्रणा वा पोलीस महसूल ग्रामीण यंत्रणेतील असतील मोठे काम करीत आहेत या संकटातून देखील आपण लवकरच बाहेर निघू असा विश्वास पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून जिल्हाधिकारी श्री रेखावार यांनी इझीटेस्ट (eZeeTest)या ई लर्निंग ॲप ची माहिती दिली याद्वारे ऑनलाइन ट्रेनिंगची उपलब्ध होणार असून त्याचा उपयोग विद्यार्थी व शिक्षकांना होईल असे त्यांनी सांगितले.
या ॲपद्वारे 11 वी व 12 वीच्या मुलांना फायदा Physics, Chemisrty, Mathematics व Biology या विषयासाठी Online मोफत ई-लर्निंग सुविधेचे उदघाटन करण्यात आले.
जिल्हयातील शिक्षण विभाग, जिल्हा परिषद आणि नामांकीत महाविद्यालयाच्या प्राचार्य व वरिष्ठ व्यक्तींमार्फत पूर्ण जिल्हयातून वरील विषायांसाठी अनुभवी शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. त्या शिक्षकांनी त्या विषयाचे भाग स्वत: निवडूण घेतलेले आहेत. या प्रत्येक भागावर त्यांचे शिकवणे रेकॉर्ड करण्यात येणार आहे आणि ते सुलभ पध्दतीने या ॲप मार्फत उपलब्ध करुन दिले जाणार आहे. अंदाजे 22 तारखेपर्यंत हे संपूर्ण रेकॉर्डींग पूर्ण करण्याचे नियोजन आहे. परंतु जसे जसे हे रेकॉर्डींग होईल तसे तसे ते विद्यार्थ्यांना या ॲपद्वारे उपलब्ध करुन दिले जाणार आहे. सदरील ॲप Play Store वर विनामूल्य उपलब्ध आहे.
या बिकट परिस्थितीमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी या सुविधेचा पुर्ण लाभ घ्यावा असे आवाहन केले. अगदी खेडयापाडयांमधील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यास यामुळे निश्चितच मदत होईल.
तरी सर्व विद्यार्थ्यांनी व पालकांनी सदरील ॲप डाऊनलोड करावे आणि या सुविधेचा पूर्ण फायदा घ्यावा असे आवाहन शिक्षण विभाग जिल्हा परिषद यांच्यामार्फत करण्यात येत आहे.
याप्रसंगी धनंयज मुंडे, मंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड जिल्हा यांनी सदरील सुविधा बीड जिल्हयातील विद्यार्थ्यांना विनामूल्य उपलब्ध करुन दिल्याबद्दल अभिनव आयटी सोल्युशन्स पुणे चे संचालक श्री.भूतडा यांचे आभार मानले. त्यांच्या हस्ते ऑनलाईन ॲप्सचे अनौपचारिक उद्घाटन करण्यात आले.
COMMENTS