राज्यातील ऊस उत्पादकांची परिस्थिती पाहता ऊसाचं गाळप करण्याचा निर्णय – धनंजय मुंडे

राज्यातील ऊस उत्पादकांची परिस्थिती पाहता ऊसाचं गाळप करण्याचा निर्णय – धनंजय मुंडे

मुंबई – राज्यातील ऊस उत्पादकांची परिस्थिती पाहता ऊसाचं गाळप करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच 34 साखर कारखान्यांची थकहमी देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यात परळीच्या कारखान्याचाही समावेश आहे, असं सांगतानाच आम्ही पाच वर्षे सुडाच्या राजकारणाचे बळी ठरलो तरीही सुडाचे राजकारण करणार नाही अशा शब्दांत राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे.

दरम्यान परळीच्या कारखान्याबाबत माझं वेगळं मत असून तो कारखाना उभा करण्यापासून नीट सुरू होईपर्यंत त्यासाठी माझ्या वडिलांचे योगदान आहे. तो कारखाना बंद राहणं मनाला पटत नव्हतं. भले ही त्याचा कारखाना चेअरमन वेगळ्या पक्षाचा आहे तरी राजकारण करणार नाही. आम्ही कारखान्याला निधी दिला आहे. विकासाचे राजकारण केलं आहे. त्यांनीही आता कारखाना चालवावा. शेतकऱ्यांची अडचण दूर करावी. सत्तेत असताना केवळ त्यांच्या लोकांच्या साखर कारखान्यांनाच मदत केली. आम्ही तसं करणार नाही असंही धनंजय मुंडे यावेळी म्हणाले.

COMMENTS