जे सिकंदरचं झालं ते तुमचंही होऊ नये, धनंजय मुंडेंचा भाजपला सल्ला !

जे सिकंदरचं झालं ते तुमचंही होऊ नये, धनंजय मुंडेंचा भाजपला सल्ला !

मुंबई – सिंकदर जग जिंकत गेला. भाजपही एक एक राज्य जिंकत जात आहे. पण सिंकदरने एक चुक केली. जिंकलेले राज्य सांभाळण्याची व्यवस्था त्यांनी केली नाही. त्याप्रमाणेच भाजप जिंकत तर आहे, पण राज्य कसे चालवावे? हे त्यांना कळत नाही. म्हणूनच जग जिंकण्याच्या इच्छेने जे सिंकदरचे झाले ते तुमचं होवू नये असा सल्ला विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाजपला दिला आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावर आभार व्यक्त करताना ते बोलत होते. त्यावेळी त्यांनी याद रख सिंकदर के हौसले तो आली थे…जब गया था दुनिया से दोनो हात खाली थे…अशी टीका त्यांनी भाजपवर केली आहे.

दरम्यान यावेळी बोलत असताना धनंजय मुंडे यांनी  ऊर भरुन यावे अशी सुरुवात राज्यपालांनी अभिभाषणाची केली. या माझ्या महाराष्ट्रात राज्यपालांच्या अभिभाषण सुरु असताना मराठीचा अपमान होत होता.त्याचं दु:ख भोगलं. मराठीचा अनुवाद का झाला नाही. अनुवादक कुणी आणायचा. पहिल्यांदा गलथान काराभारामुळे तावडेंना मराठी अनुवाद करावा लागला. मराठीचा अपमान पाहिला म्हणून खेद व्यक्त करत असल्याचे म्हटलं. तसेच आजकाल सरकारमधील लोकांना राग खूप येत आहे. साडेतीन वर्ष झालेत राग वाढणार हे स्वाभाविकच आहे. कारण विरोधी पक्ष एकवटतोय म्हणून तो राग आहे असा टोलाही त्यावेळी मुंडे यांनी सरकारला लगावला आहे.

COMMENTS