मुंबई – सरकारने आता फक्त शेतकर्यांच्या श्वास घेण्यावर आणि जिवन जगण्यावरच कर लावणे बाकी ठेवले असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. उद्योगपतींचे लाखो कोटी रूपये कर्ज माफ करणारे सरकार शेतकर्यांच्या खिशातील पैसे काढुन घेण्याचा एकही मार्ग सोडायला तयार नाही अशा शब्दात सरकारच्या नवीन भुजल धोरणारही धनंजय मुंडे यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
सरकारने आता फक्त शेतकऱ्यांच्या श्वास घेण्यावर आणि जीवन जगण्यावरच कर लावणे बाकी ठेवले आहे. उद्योगपतींचे लाखो कोटी रुपये कर्ज माफ करणारे सरकार शेतकऱ्यांच्या खिशातील पैसे काढून घेण्याचा एकही मार्ग सोडायला तयार नाही. धिक्कार असो. @Dev_Fadnavis @narendramodi @NCPspeaks @zee24taasnews https://t.co/2Qyl6oGOvH
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) September 8, 2018
दरम्यान सर्वस्तरावरून शेतकर्यांना मारायचे त्यांना संपवुन टाकायचे असे सरकारचे धोरण असल्याचे म्हणत सरकारच्या या नविन भुजल धोरणाला मुंडे यांनी कडाडुन विरोध केला आहे. राज्य सरकारने नविन भुजल धोरण तयार केले असुन त्यानुसार आता शेतकर्यांना त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या विहीरीतील पाणी वापरावरही कर द्यावा लागणार आहे. सरकारच्या या धोरणाचा मुंडे यांनी कडाडुन विरोध केला आहे.
COMMENTS