परळी – परळी शहर ब्राम्हण बहुउद्देशीय सभेच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या स्व.मनोहर पंत बडवे सामाजिक सभागृहाला विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी 15 लाखांचा निधी दिला असून, त्याच्या कार्यारंभ आदेशाचे हस्तांतरण आज सभेचे अध्यक्ष शरदराव कुलकर्णी यांच्याकडे करण्यात आले.
शहरातील गणेशपार भागात ब्राम्हण सभेच्या वतीने स्व.मनोहर पंत बडवे सामाजिक सभागृह तसेच विठ्ठल-रूक्मीणी मंदिर उभारले जात आहे. या सभागृहाच्या कामासाठी ना.मुंडे यांनी 15 लाखांचा निधी देण्याची घोषणा केली होती, आपल्या स्थानिक विकास निधीतून त्यांनी तो निधी दिला असून, त्याचा कार्यारंभ आदेश सुपूर्त करण्याचा आदेश आज जगमित्र कार्यालयात छोटेखानी कार्यक्रमात पार पडला. याच कार्यक्रमात सिरसाळा येथील ब्राम्हण समाजाच्या स्मशानभूमीसाठी 5 लक्ष रुपयांच्या निधीची ही त्यांनी घोषणा केली.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांनी प्रास्ताविकात धनंजय मुंडे यांचे समाजाच्या प्रत्येक उपक्रमात सक्रीय सहकार्य केल्याबद्दल आभार व्यक्त करतानाच समाजातील युवकांना जास्तीत-जास्त रोजगार नोकर्यांमध्ये संधी देण्याची मागणी केली. त्यावर बोलताना आपण या समाजातील एक घटक असून, शहरातील प्रत्येक समाजासाठी सामाजिक सभागृहाची उभारणी केली आहे. त्याचाच एक भाग म्हणुन ही मदत दिली आहे. त्यामागे कोणतीही भावना नाही मात्र सुख, दुःखात आणि अडचणीच्या काळात धावुन येणार्याच्या पाठीशी समाजाने उभे राहिले पाहीजे ही अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी ना.मुंडे यांचा आषाढी एकादशीचे औचित्य साधुन विठ्ठल-रूक्मीणीची मुर्ती देवुन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास श्रीकांतजी मांडे, डॉ. गुरुप्रसाद देशपांडे, डॉ आनंद टिबे, डॉ दीपक पाठक ,डॉ तुषार पिंपळे,अजय जोशी,बलवीर रामदासी,शामराव दैठणकर, नितिन मामा कुलकर्णी, बाळूभाऊ अर्विकर,कुमार पुराणिक,प्रमोद भालेराव,अनंत (पपु)कुलकर्णी,हेमंत लोंढे,दिपक वंजारखेडकर, दीपक अवलगावकर,संतोष पांडे,हेमंत लोंढे,बाळासाहेब टेकाळे,सचिन जोशी,देशपांडे साहेब,संजीव खिस्ते,श्रीपाद पाठक, जितेंद्र नव्हाडे,विनायक टूनकीकर, श्रीपाद चौधरी, जयराम गोंडे,विश्वाम्बर देशमुख,दयानिधी खिस्ते, अतुल नरवाडकर,प्रताप धर्माधिकारी, प्रशांत नाईक,वैजनाथ जोशी,प्रकाश चाटूफळे,नागेश जोशी, ओंकार कुलकर्णी,अक्षय पत्की,योगेश पाटील,रत्नाकर कुलकर्णी,चारुदत्त करमाळकर,ऋषिकेश कुलकर्णी,पपू पांडे,भाग्येश आंबेकर आदी उपस्थित होते.
COMMENTS