एवढा अहंकार बाळगू नका, धनंजय मुंडेंचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर ! VIDEO

एवढा अहंकार बाळगू नका, धनंजय मुंडेंचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर ! VIDEO

मुंबई – लोकसभेत ज्यांना दोन अंकी खासदारांचा आकडा पार करता आला नाही. ते पण पंतप्रधानपदाच्या रेसमध्ये आहेत. पंतप्रधानपदाची खुर्ची आहे की संगीत खुर्ची हेच कळत नसल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केली होती. त्यांच्या या टीकेला राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मुख्यमंत्र्यांनी एवढा अहंकार बाळगू नये, भाजपाचे कधीकाळी दोन खासदार होते हे मुख्यमंत्र्यांनी विसरू नये.

बेडकाने किती फुगले तरी बैल होत नाही हे त्यांनी लक्षात ठेवावे असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. तसेच जनतेने महाआघाडीचे नेत्तृत्व शरद पवार यांनी करण्याचे ठरवले असून आता जनतेनं  भाजपाचे सरकार घालवायचे ठरवलं असल्याचंही मुंडे यांनी म्हटलं आहे.

COMMENTS