असंवेदनशील मुख्यमंत्री, गिरीश महाजनांचा तात्काळ राजीनामा घ्या – धनंजय मुंडे

असंवेदनशील मुख्यमंत्री, गिरीश महाजनांचा तात्काळ राजीनामा घ्या – धनंजय मुंडे

मुंबई -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा राजीनामा देण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी केल्यानंतर आज जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे पुराची पाहणी करत आहेत. महाजन हे बोटीत स्वार होऊन कोल्हापूर सांगलीच्या भागामध्ये फिरत आहेत, यावेळी महाजन यांच्या समवेत बोटीमध्ये बसलेल्या एका व्यक्तीने सेल्फीसाठी मोबाईल उंचावला, तर महाजन हे हसत सेल्फी देत होते. गिरीश महाजन यांच्या सेल्फीचा हाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, त्यामुळे राज्यातील मंत्री किती असंवेदनशील बनले आहेत, हा प्रश्न उपस्थित होत आहे. आता यावर गिरीश महाजन यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे.

महापूर पाहणीवेळी मंत्री गिरीश महाजन आणि अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू, सेल्फीसाठी पोझ. पुराची पाहणी करण्यासाठी गेले आहेत की पर्यटनासाठी? सत्ताधाऱ्यांना काही संवेदना उरल्या आहेत की नाही ? मुख्यमंत्री साहेब या असंवेदनशील मंत्र्यांचा तात्काळ राजीनामा घ्या,अधिकाऱ्यांचे निलंबन करा. अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंनी केली आहे.

COMMENTS