गंगाखेड – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या महाजनादेश यात्रेत त्यांनी केलेल्या वक्तव्याचा धनंजय मुंडे यांनी पुराव्यानिशी समाचार घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेला प्रतिसाद नाही… असे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केले होते. त्याला उत्तर म्हणून प्रचंड समुदाय उपस्थित असलेल्या गंगाखेड सभेचा फोटो ट्विट केलं आहे. खास तुमच्यासाठी हा फोटो… उघडा डोळे, बघा नीट असा टोलाही त्यांनी या ट्वीटमध्ये मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेला मराठवाड्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. यादरम्यान राष्ट्रवादीचे प्रमुख नेते सरकारवर सडकून टीका करत आहेत. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेत धनंजय मुंडे यांनीही सरकारवर टीकेची तोफ डागली आहे.
आज गंगाखेडमध्ये झालेल्या सभेत त्यांनी सरकारचा खरपूस समाचार घेतला. या सरकारच्या विरोधात कोणी आवाज केला तर ‘ईडी’ लिंबू फिरवले जाते. राज ठाकरे यांनी अमित शाह, मोदींचा पर्दाफाश केला त्यामुळेच त्यांच्यावर ईडीची चौकशी लावली. राज ठाकरे आघाडी सरकारवरही प्रचंड टीकास्त्र सोडायचे. ईडी तेव्हाही अस्तित्वात होते पण आघाडी सरकारने कधीच नीच राजकारण केले नाही अशी बतावणी त्यांनी केली.
गंगाखेड साखर कारखान्यात ६०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला. गंगाखेडच्या लोकांना या साखर कारखान्याच्या मालकाने दिवसाढळ्या लुटले. मात्र मुख्यमंत्र्यांच्या कृपेने साखर कारखान्याच्या मालकावर एफआयआर सुद्धा दाखल झाली नाही.भ्रष्ट लोकांना यांचाच आशीर्वाद आहे अशी टीका त्यांनी केली.
या यात्रेत विधिमंडळाचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेत धनंजय मुंडे, खा. डॉ. अमोल कोल्हे, आमदार डॉ मधुसूदन केंद्रे, शिक्षक आमदार विक्रम काळे, आमदार सतीश पाटील, मिथीलेश केंद्रे हे सुद्धा उपस्थित होते.
मुखमंत्री महोदय म्हणतात, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेला प्रतिसाद नाही…@Dev_Fadnavis साहेब, खास तुमच्यासाठी हा फोटो… उघडा डोळे, बघा नीट!#शिवस्वराज्ययात्रा #शिवसुराज्य @NCPspeaks @CMOMaharashtra @BJP4Maharashtra pic.twitter.com/gRTaKyI403
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) August 23, 2019
COMMENTS