मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सरकारी जमीन हडप केल्याप्रकरणी धनंजय मुंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. यावर धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अधिवेशनाच्या तोंडावर अशी प्रकरणे समोर आणली जातात. या प्रकरणात रत्नाकर गुट्टे यांचा जावई याचिकाकर्ता आहे.
गुट्टेने 28000 शेतक-यांना 5400 कोटी रुपयांना फसवले आहे, ते प्रकरण मी लावून धरल्याने गुट्टेला अटक झाली आहे. ही जमीन सरकारी किंवा देवस्थानाची नव्हती. मी जमीन विकत घेतली तेव्हा देशमुख आणि चव्हाण यांच्या नावावर होती. असं मुंडे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान जमीन खरेदी करताना रितसर तीन वर्ष आधीचे सातबारा बघितले होते, त्यावर कुठेही देवस्थानाचा उल्लेख नव्हता. न्यायालयाने आमची बाजू न ऐकता निकाल दिला. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असून
– मी कारखान्यासाठी दुसरीकडे जमीन घेतली आहे, त्यामुळे ही जमीन ज्यांना परत हवी त्यांना मी ज्या भावाने तेव्हा खरेदी केली होती त्या भावाने परत द्यायला तयार आहे. माझ्यावर कितीही दबाव आला तरी अधिवेशनात मंत्र्यांची प्रकरणे समोर आणणार असल्याचंही मुंडे यांनी म्हटलं आहे.
COMMENTS