केवळ घोषणा आणि मागण्यांशिवाय सरकार काय करतय ?, धनंजय मुंडेंचा सरकारवर हल्लाबोल !

केवळ घोषणा आणि मागण्यांशिवाय सरकार काय करतय ?, धनंजय मुंडेंचा सरकारवर हल्लाबोल !

बीड, परळी – राज्य दुष्काळात होरपळत असतांना  सरकार मात्र केवळ केंद्र सरकारकडे सात हजार कोटींची मागणी केल्याची घोषणा करत आहे. मुख्यमंत्र्यांच्याच घोषणेचीच री इतर मंत्री ओढत आहेत. केवळ घोषणा आणि मागण्या करत बसण्यापेक्षा राज्य सरकार शेतकर्‍यांसाठी  काय करत आहे हे सांगावे अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

ऐन दिवाळीत सलग तिसर्‍या दिवशी धनंजय मुंडे यांनी आज परळी तालुक्यातील सारडगांव, दादाहरी वडगांव भागातील जवळपास पंधराहुन अधिक गावातील नागरिकांशी गावनिहाय व्यक्तीशः चर्चा केली. पाण्या अभावी उध्दवस्त झालेल्या बालाजी निवृत्ती बोबडे यांच्या कापुस पिकाची पाहणीही केली. त्यानंतर गावकर्‍यांशी संवाद साधतांना ते बोलत होते. या दौर्‍यात त्यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेसेच जिल्हा सरचिटणीस प्रा.डॉ.मधुकर आघाव, तालुकाध्यक्ष लक्ष्मणराव पौळ, न.प.गटनेते वाल्मिकअण्णा कराड,  युवक नेते माणिकभाऊ फड, पंचायत समितीचे उपसभापती पिंटु मुंडे, मार्केट कमिटीचे माजी सभापती सुर्यभान मुंडे, विकास बिडगर आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते.

पाण्याची भिषण परिस्थिती उदभवणार आहे. शंभर-शंभर किलोमिटर लांबुन पाणी आणावे लागणार आहे. त्यामुळे उपलब्ध बोरणा धरणातील पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले. वैद्यनाथ कारखान्याला पाणी लागणार आहे म्हणुन बाराशेहुन अधिक शेतकर्‍यांचे पाणी बंद केल्याचा आरोपही त्यांनी केला. राज्य सरकार केवळ केंद्राकडे हात पसरण्याचे काम करत आहे. स्वतःच्या तिजोरीची वाट लावुन टाकल्यामुळे सरकारवर ही वेळ आली असुन त्याची फळे मात्र जनतेला भोगावी लागत आहेत. केंद्राकडे काय मागीतले याच्याशी आम्हाला घेणे देणे नाही. तर तुम्ही शेतकर्‍यांना काय देणार आहात हे आधी सांगा असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

COMMENTS