बीडमधील दुष्काळासंदर्भात धनंजय मुंडे आक्रमक, उद्या शिष्टमंडळासह घेणार जिल्हाधिकार्‍यांची भेट !

बीडमधील दुष्काळासंदर्भात धनंजय मुंडे आक्रमक, उद्या शिष्टमंडळासह घेणार जिल्हाधिकार्‍यांची भेट !

बीड, परळी – विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे उद्या मंगळवार दि.18 डिसेंबर रोजी बीडच्या दौर्‍यावर असुन ते तसेच माजी मंत्री प्रकाशदादा सोळंके, माजी आमदार अमरसिंह पंडित व जिल्ह्यातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेसची नेते मंडळी दुष्काळाच्या प्रश्ना संदर्भात जिल्हाधिकार्‍यांना भेटणार आहेत. परळी तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या अडचणींबाबत ना.मुंडे हे वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकांनाही भेटणार  आहेत.

वैद्यनाथ साखर कारखान्याकडुन ऊस गाळपात ऊस उत्पादक शेतकरी, सभासदांवर मोठ्या प्रमाणावर अन्याय होत असल्याने ना.मुंडे हे सकाळी 11 वाजता कारखान्याच्या कार्यकारी संचालकांना भेटुन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर दुपारी 2.30 वाजता दुष्काळाच्या प्रश्नां संदर्भात राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ जिल्हाधिकार्‍यांना भेटणार असुन त्या शिष्टमंडळात मुंडे यांच्यासह माजी मंत्री सोळंके, माजी आमदार पंडित, जिल्हाध्यक्ष बजरंगबप्पा सोनवणे, युवक नेते संदिप क्षिरसागर यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्व माजी आमदार, प्रमुख पदाधिकारी यांचा समावेश असणार आहे. त्यानंतर मुंडे हे बीडच्या शासकिय विश्रामगृहावर पत्रकारांशीही संवाद साधणार आहेत.

COMMENTS