नागपूर- राज्यात जलयुक्त शिवार अयशस्वी झाले असले तरी फडणवीस सरकारने नागपूरात पावसाळी अधिवेशन घेऊन ‘जलयुक्त नागपूर’ असल्याचे मात्र दाखवून दिले आहे अशी खोचक टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी राज्य सरकार वर केली आहे.
नागपूर येथे पावसाळी अधिवेशन सुरू असताना जोरदार पाऊस झाल्याने विधानभवनाच्या आवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचला असून, येण्या जाण्यासाठी पाण्यातून जावं लागत असल्याने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
त्याचबरोबर विधानभवनातील लाईट गेल्याने पहिल्यांदाच कामकाज अंधारातच उरकावा लागत आहे.राज्यसरकार च्या बालहट्टामुळे पावसाळी अधिवेशन हे मुंबई ऐवजी नागपूर येथे घेण्यात आले आहे कारण फडणवीस सरकारला जलयुक्त नागपूर आम्हा लोकांना दाखवायचं होत अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली त्याच बरोबर विधिमंडळाच्या इतिहासात अधिवेशन काळात लाईट जाऊन कामकाज बंद पडावे लागण्याची ही पहिलीच वेळ आहे. सरकारचा नियोजनशून्य कारभार, नागपूरला अधिवेशन घेण्याचा निरर्थक बालहट्ट यामुळे ही वेळ आली असल्याचंही धनंजय मुंडे म्हणाले. दरम्यान मोठ्या प्रमाणात पाणी साठल्याने व वीज बंद पडल्याने दिवसभराच कामकाज स्थगित करण्यात आलं आहे.
COMMENTS