उद्योगपती, बिल्डरांसाठी लाल गालिचा टाकणा-या सरकारकडून शेतकऱ्यांच्या मागण्यांना केराची टोपली –धनंजय मुंडे

उद्योगपती, बिल्डरांसाठी लाल गालिचा टाकणा-या सरकारकडून शेतकऱ्यांच्या मागण्यांना केराची टोपली –धनंजय मुंडे

परभणी – मानवत तालुक्यातील 5 शेतक-यांनी आपल्या मागण्यांसाठी तहसील कार्यालयात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना अतिशय गंभीर असल्याचं वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलं आहे. पंधरा दिवसांपूर्वी आपल्या मागण्यांसाठी प्रशासनाला कळवूनही त्यावर काहीच कारवाई न झाल्याने शेतकऱ्यांना हे टोकाचे पाऊल उचलावे लागले असून प्रशासन ढिम्मपणे काम करत असून ते किती गेंड्याच्या कातडीचे आहे हे या घटनेवरून लक्षात आलं आहे.तसेच उद्योगपती आणि बिल्डरांसाठी लाल गालिचा टाकणारे हे सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांना मात्र केराची टोपली दाखवत असल्याची टीका त्यांनी केली आहे. तसेच या घटनेची चौकशी करून शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या तहसीलदार आणि सर्व संबंधितांवर निलंबनाची तातडीने कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

दरम्यान पाणीपुरवठा योजनेच्या प्रश्नावरून या शेतक-यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला असून सहापैकी एका शेतक-याची प्रकृती चिंताजनक आहे. मानवत तहसिल कार्यालयात या शेतकऱ्यांनी सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

COMMENTS