राज्य सरकार शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळतेय   – धनंजय मुंडे

राज्य सरकार शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळतेय – धनंजय मुंडे

मुंबई – राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना क्विंटलमागे २०० रुपयाचं अनुदान देण्याचा घेतलेला निर्णय म्हणजे सरकारने शेतकऱ्यांची केलेली मोठी चेष्टा आहे असे म्हणत विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली.

कांद्याला २०० रु प्रति क्विंटल अनुदान सरकारने जाहीर केले आहे, शेतकऱ्यांची मुळात मागणी ही ५०० रु प्रति क्विंटल असे अनुदान कांद्याला मिळावे अशी आहे याचाच अर्थ सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत.

या आधी २०१६ साली कांद्याला १ रु प्रति किलो असे अनुदान सरकारने जाहीर केले होते. सरकारने दीड वर्षानंतर अनुदान म्हणून एकूण ४५ कोटी वाटप केले पण ते कोणाला मिळाले माहीत नाही असेही मुंडे म्हणाले. 2 रु नव्हे तर 5 रु अनुदान प्रतिकिलोला देऊन एक महिन्याच्या आत ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावेत अशी मागणी ही त्यांनी केली आहे.

राज्यात सर्वत्र दुष्काळ आहे. जर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारने एक आठवड्यात दिलासा दिला नाही तर नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सोबत घेऊन मोठे आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस करेल असा इशाराही मुंडेंनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिला.

COMMENTS