आदरणीय आप्पा…धनंजय मुंडेंनी लोकनेते गोपीनाथराव मुंडेंना केलं अभिवादन  !

आदरणीय आप्पा…धनंजय मुंडेंनी लोकनेते गोपीनाथराव मुंडेंना केलं अभिवादन !

मुंबई – विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज मुंबई येथील त्यांच्या शासकीय निवासस्थानी स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच त्यानंतर जाणते राजे शरद पवार साहेबांची भेट घेऊन त्यांना वाढदिवासानिमित्त शुभेच्छा दिल्या.

<blockquote class=”twitter-tweet”><p lang=”mr” dir=”ltr”>स्वर्गीय अप्पांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आज अभिवादन केले. अप्पा म्हणजेच स्व. मुंडे साहेबांनी मला जनसामान्यांसाठी संघर्ष करण्याची शिकवण आणि त्यांचा संघर्षाचा वारसा दिला.

एकेकाळी कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या स्व. गोपीनाथरावजी मुंडे आणि श्री शरद पवार साहेब या दोहोंचा जन्मदिन १२ डिसेंबरच आहे. धनंजय मुंडेंच्या जडणघडणीत आणि राजकीय वाटचालीत या दोघांचेही मोलाचे योगदान आहे. स्व. गोपीनाथराव मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर संघर्षाचे संस्कार करत त्यांचा पाया भक्कम केला तर पुढे शरद पवारांनी धनंजय मुंडेंना मजबूत पाठबळ दिले. त्यामुळे आजच्या दिवसाचे धनंजय मुंडेंसाठी एक वेगळेच महत्त्व असणार हे निश्चित.

दरम्यान आदरणीय आप्पा आपण शिकवण दिलेल्या जनसामान्यांसाठी संघर्ष या वाटेवरच मी चालतो आहे, सदैव आपणास आठवणीत आणि हृदयात ठेऊन” असे ट्विटही मुंडे यांनी केले आहे.

त्यानंतर धनंजय मुंडे यांनी जाणते राजे शरदचंद्रजी पवारांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची मुंबईत भेट घेऊन अभिष्टचिंतन केले. देशाची धुरा सांभाळण्यासाठी आपल्याला उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो अशा शुभेच्छा मुंडेंनी पवारांना दिल्या. यावेळी त्यांनी नुकत्याच केलेल्या बेळगाव दौ-याची माहितीही पवारांना दिली.

COMMENTS