फडणवीस सरकार ब्रिटिश मनोवृत्तीचं – धनंजय मुंडे

फडणवीस सरकार ब्रिटिश मनोवृत्तीचं – धनंजय मुंडे

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कालच्या धुळे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मंत्रालयात आत्महत्या करणा-या धर्मा पाटील यांच्या पत्नी सखुबाई आणि मुलगा नरेंद्र पाटील यांना ताब्यात घेतलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात नरेंद्र पाटील यांनी आक्रमक आंदोलन करु नये, यासाठी पोलिसांनी या दोघांना सकाळी सहा वाजल्यापासून पोलीस ठाण्यात बसवून ठेवलं. यावरुन धनंजय मुंडे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.ही कारवाई म्हणजे सरकारची ब्रिटिश मनोवृत्ती दाखवून देते असं मुंडे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान मी 24 डिसेंबर रोजीच दोंडाईचा पोलिसांना लेखी लिहून दिले होते की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यात आपण कोणत्याही गैरकायदेशीर मार्गाचा अवलंब करणार नाही. माझ्याकडून असे कोणत्याही प्रकारचे कृत्य होणार नाही. तरी मला आणि माझ्या आईला सकाळी सहा वाजेपासून पोलीस स्टेशनला विनाकारण बसवून ठेवले असल्याचं नरेंद्र पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच आता मंत्री आल्याशिवाय आपण पोलीस ठाण्यातून हलणार नाही असा पवित्रा नरेंद्र पाटील यांनी घेतला होता. त्यामुळे हे प्रकरण आता जास्तच चिघळत असल्याचं दिसत आहे.

COMMENTS