मुंबई – देवेंद्र फडणवीस सरकारमधील १६ मंत्र्यांचे मी घोटाळे पुराव्यानीशी बाहेर काढले त्यामुळे मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. विरोधीपक्ष जेव्हा सरकारवर भारी होतो, तेव्हाच विरोधी पक्षातील व्यक्तींना बदनाम करण्याचं काम केलं जाते. आरोप करायचाच असेल तर तो सिद्ध करून दाखवा असे आव्हान त्यांनी दिले.
ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांनी माझ्यासाठी राजकारण सोडलं असतं असं वक्तव्य केले होते त्याला उत्तर देताना त्यांनी राजकारण सोडले असते की नाही हे माहीत नाही. मात्र २००९ साली मी निवडणूक लढवावी अशी लोकभावना असतानाही ताईंसाठी मी मात्र आमदारकी सोडली होती. बहिणीच्या प्रचारावेळी घोषणा देणारा मी पहिला होतो अशी आठवण करून दिली.
बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस नंबर एकची पार्टी आहे. स्थानिक पातळीवर मायबाप जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली. जनतेचा पाठिंबा आणि विश्वास आमच्या बाजूने आहे त्यामुळे येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीलाच अग्रस्थान मिळणार हे निश्चित मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
लोकसभा लढवणार की विधानसभा ?
लोकसभा लढवणार की विधानसभा या प्रश्नावर, विधानसभा लढवण्यासाठी उत्सुक असलो तरी पक्षश्रेष्ठींचे आदेश पाळणार. कुठल्याही पदासाठी नाही तर, परिवर्तनासाठी लढत असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी धनंजय मुंडे यांनी दिलंं .
COMMENTS