मुंबई – आज लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा स्मृतीदिन आहे. त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त राज्यभरात मुंडे यांना आदरांजली वाहिली जात आहे. गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांचे पुतणे आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी आठवणींना उडाळादिला आहे. धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट लिहिली असून यामध्ये त्यांनी ‘आप्पा, तुमचाच वारसा चालवतोय…’ असं म्हटलं आहे. धनंजय मुंडे सातत्याने गोपिनाथ मुंडेंच्या आठवणींना उजाळा देत असतात. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांन लोकांना माझ्यात लोकनेते गोपीनाथ मुंडेंची छबी दिसते, असं म्हटलं होतं. त्यानंतर आज पुन्हा ‘आप्पा तुमचाच वारसा चालवतोय…’, असं त्यांनी म्हटलं आहे.
https://m.facebook.com/DPMunde/photos/a.1454908048072154/2396682883894661/?type=3&refsrc=http%3A%2F%2Fwww.thodkyaat.com%2Fdhananjay-munde-facebook-post%2F
दरम्यान 3 जून 2014 रोजी नवी दिल्लीत रस्ते अपघातात मुंडे यांचा मृत्यू झाला. आज राज्यभरात त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. मुंडे यांच्या गावी परळीतही मुंडे यांच्या स्मृतीला अभिवादन केलं जातंय. गोपीनाथ मुंडे यांचं आयुष्य संघर्षमयी होतं. त्यांनी राजकारणात अगदी तळागाळापासून कामाला सुरुवात केली. राजकारणाचा कोणताच वारसा नसताना, मराठवाड्यातल्या मागास भागात जन्म घेतलेल्या गोपीनाथ मुंडे यांनी कष्टाच्या जोरावर राजकारणात झेप घेतली. परंतु काळाने त्यांच्यावर घाला घातला. 3 जून 2014 रोजी नवी दिल्लीत रस्ते अपघातात मुंडे यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमुळे राज्यासह देशात दुखःचा डोंगर कोसळला आहे.
लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त यावर्षीही विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानने केले आहे. समाजातील वंचित, उपेक्षित घटकांना मदतीचा हात देण्याबरोबरच गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, शेतकरी तसेच महिला बचतगटांना सहाय्य यानिमित्ताने दिले जाते. आजही परळीसह राज्यात अनेक ठिकाणी असे सामाजिक उपक्रम राबविले जातात.
COMMENTS