मुंबई – “आजचा दिवस ऐतिहासिक आहे. विधानपरिषदेत सरकारने मांडलेल्या मराठा आरक्षणाला मी व आम्ही सर्व विरोधी पक्षांनी एकमताने पाठिंबा दिला. आज माझ्या जीवनातील आनंदाचा क्षण आहे. या आरक्षणासाठी लढा देणा-या सकल मराठा समाजाचे आणि पाठिंबा देणा-या सर्वांचे मी आभार मानतो अशा शब्दात विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मराठा आरक्षणाच्या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला.
दरम्यान सकल मराठा समाजाने शांततेत काढलेले मोर्चे, विरोधी पक्षांनी केलेले विविध आंदोलनांपुढे सरकारला झुकावे लागले. काही बांधवांनी आरक्षणासाठी बलिदान दिले; अखेर आज मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणासाठी विधेयक मांडले त्याला विरोधी पक्षांच्यावतीने मी लगेचच अनुमोदन दिले. मराठा आरक्षणासाठी आमची प्रामाणिक तळमळ होती पण सरकारचं याबाबत दिरंगाई करत होते.
मराठा आरक्षणाप्रमाणेच सरकारने धनगर आरक्षण प्रश्न सकारात्मकपणे हाताळावा असे आवाहन मुंडेंनी केले. टिसचा अहवाल सरकारने सभागृहात मांडावा. या अहवालात कदाचित धनगर आरक्षण विषयी नकारात्मक शिफारसी असतील म्हणून सरकार याबाबत दिरंगाई करत असावे अशी भीतीही धनंजय मुंडेंनी व्यक्त केली.
COMMENTS