राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी ‘ते’ विधान केलं होतं – धनंजय मुंडे

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी ‘ते’ विधान केलं होतं – धनंजय मुंडे

यवतमाळ – राष्ट्रवादी काँग्रसचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आगामी निवडणुकीत परळीतून राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार मीच होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. काही दिवसांपूर्वी मुंडे यांनी काँग्रेसला परळीची जागा सोडू, असं विधान केले होते. परंतु ते विधान तेथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी केलं होतं असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. यवतमाळमधील वणी येथे पक्षाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात मुंडे बोलत होते.

दरम्यान तेथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढण्यासाठी आपण वणीसाठी परळीची जागा सोडू, असे वक्तव्य केलं ते होतं. परंतु माझ्या या वक्तव्यामुळे स्थानिक विरोधकांना आनंद झाला होता. मात्र परळीतील जनतेची इच्छा असल्याने २०१९ ला मीच या भागाचा आमदार होणार असल्याचं धनंय मुंडे यांनी यावेळी म्हटलं आहे.

 

COMMENTS