विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाबाबत धनंजय मुंडे म्हणतात…

विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाबाबत धनंजय मुंडे म्हणतात…

बीड, परळी – विधानसभा निवडणुकीत भाजपला 105, शिवसेनेला 56 जागा, राष्ट्रवादीला 54 जागा तर काँग्रेसला 44 जागा मिळाल्या आहेत. या निकालावरुन सत्ता शिवसेना -भाजपकडे गेली असली तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीही तिसय्रा स्थानावर आहे. भाजप -शिवसेना सत्तेवर विराजमान झाल्यास राष्ट्रवादीकडे विधानसभेचं विरोधी पक्षनेते पद जाणार आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे नाव आघाडीवर आहे.याबाबत धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपदासाठी मी कोणताही दावा केलेला नाही. मी कुठल्याही पदासाठी  प्रयत्न केलेला नाही. यापूर्वीच्या विरोधीपक्षनेते पदासाठी मी दावा केला नव्हता. असं धनंजय मुंडे म्हणाले आहेत. तसेच मी कधीही कुठल्याही पदासाठी काम केले नाही. 2014 च्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर शरद पवारांनी माझ्यावर विधानपरिषद विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी दिली. 2014 च्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार साहेबांनी माझ्यावर विधानपरिषद विरोधीपक्षनेते पदाची जबाबदारी टाकली. मी योग्यरित्या या पदाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. यावेळी महाराष्ट्राच्या जनतेच्या अनेक समस्या मी विधानपरिषदेत मांडल्या. त्यासाठी मला सरकारशी संघर्षही करावा लागला. एवढंच नाही काही प्रमाणात आपण महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला विरोधी पक्षात राहून सुद्धा न्याय मिळू शकतो, हेसुद्धा मी महाराष्ट्राच्या जनतेला दाखवून दिले आहे असंही मुंडे यांनी म्हटलं आहे.

COMMENTS