बीड – विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि परळी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार धनंजय मुंडे यांचा विजय झाला धनंजय मुंडे यांनी भाजपच्या पंकजा मुंडे यांचा पराभव केला. यावर धनंजय मुंडे यांनी आज प्रतिक्रिया दिली आहे. मी त्यादिवशी तुम्हाला जे सांगितलं त्यांना तसे आजही तेच वाटतंय. हे शेवटी या निवडणुकीमध्ये भावाची आणि बहिणीची ही निवडणूक जरी आपण सगळे म्हणतात तरी ती दोन पक्षाच्या उमेदवारांची निवड होती. दोन पक्षांच्या विचारांची निवडणूक होते. त्यामुळे या निवडणुकीत त्यांचा पक्ष हरला. त्यांचा विचार हरला. आमचा पक्ष जिंकला. आमचा विचार जिंकला.
दरम्यान राहिला विषय बहीण-भावाच्या नात्याचा तर मी मोठा आहे. नक्कीच विजयाचा आनंद आहे. पण कुठेतरी दुःख आहे. शल्य आहे की शेवटी घरातलाच एक व्यक्ती या निवडणुकीत आपल्याकडून पराभूत झाला. त्यामुळे जे माझं मत होतं ते स्वाभाविक आहे. घरातला मोठा म्हणून या ठिकाणी आपल्यावर ती जबाबदारी आपण पार पडतोय. तसेच आमच्यामध्ये अनेक दिवसांमध्ये संवाद नाही. पुढे कुठले संवादाची अपेक्षा माझ्यासारख्यांनी ठेवू नये. तेही उचित नाही. माझ्यासारख्याने संवाद केला तर त्या संवादाचा सन्मान होईल किंवा मान ठेवला जाईल असे माझ्यासारख्याला पूर्वीचा अनुभव लक्षात घेता आज वाटत नाही. तो काय आता आमच्या विषय राहिला नाही असंही मुंडे यांनी म्हटलं आहे.
COMMENTS