मावळ – राष्ट्रवादीची निर्धार परिवर्तन यात्रेतील सभा आज मावळमध्ये पोहोचली होती. यावेळी बोलत असताना मावळ मतदारसंघातून पार्थ पवार यांना उमेदवारी देण्याची मागणी परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यासपीठावरून केली आहे. मावळ मतदारसंघात आपण पराभूत होत आलोय, त्यामुळे दादा आता पार्थला उठ म्हणा, असं वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केलं आहे.
दरम्यान लोकसभा निवडणुकीमध्ये मावळमधून पार्थ पवार यांच्या उमेदवारीची मागणी धनंजय मुंडे यांनी पहिल्यांदाच उघडपणे केली आहे. यापूर्वी शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्या मावळमधून निवडणूक लढवण्याबाबत प्रतिकुलता दर्शवली होती. पवार घराण्यातील सगळ्यांनी निवडणूक लढवली तर पक्षबांधणी करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार?,असा सवाल शरद पवार यांनी विचारला होता.
यानंतर अजित पवार यांनी अजून बऱ्याच घडामोडी घडायच्या आहेत’, सूचक वक्तव्य केलं होतं. ‘ त्यानंतर धनंजय मुंडेंनी मावळ मतदारसंघातून पार्थ पवार यांना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे.
COMMENTS