माझ्या घरासमोर मोदींना सभा घ्यावी लागते यातच माझा विजय- धनंजय मुंडे

माझ्या घरासमोर मोदींना सभा घ्यावी लागते यातच माझा विजय- धनंजय मुंडे

परळी वै. – 24 तास जनतेसाठी राबणार्‍या एका सामान्य कार्यकर्त्याला संपवण्यासाठी देशाच्या पंतप्रधानाला माझ्या घरासमोर सभा घ्यावी लागते यातच माझा विजय असल्याचा विश्वास विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी गणेशपार या त्यांच्या पारंपारिक बालेकिल्ल्यातील जाहीर सभेत बोलताना केला. ही निवडणूक आता धनंजयची राहिली नसून, जनतेची झाली असल्याचे माजी मंत्री पंडीतराव दौंड यांनी सांगितले तर धनंजयचा विजय ही परळीची गरज असल्याचे प्रतिपादन माकपचे नेते कॉ.पी.एस.घाडगे यांनी केले.

धनंजय मुंडेंनी गणेशपार भागाला खुप काही दिले आता त्याची परतफेड करण्याची आमची वेळ असल्याचे काँग्रेसचे नेते डॉ.सुरेश चौधरी, किर्तीकुमार नरवणे, श्रीकांत मांडे, बाजीराव धर्माधिकारी, दिपक देशमुख, प्रा.डॉ.विनोद जगतकर, वैजनाथ सोळंके यांनी सांगितले.

गणेशपार आणि विजयाचा कौल

ज्या-ज्यावेळी गणेशपारच्या मंदिरात आशीर्वाद घेवून मी सभा घेतली, त्या-त्या वेळी गणरायाने मला कौल दिला आहे. योगायोगाने काल संकष्ट चतुर्थी होती आणि त्याच दिवशी या ठिकाणी सभा झाली, हा एक शुभ शकुन असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगून या गणेश मंदिराचा जीर्णोध्दार करण्याचे, शेजारच्या दुर्गोत्सव मंडळाला सभामंडप देण्याची शक्ती मला गणरायानेच दिली आहे. आज याच गणरायाचे आणि येथील जनतेचे आशीर्वाद मला मिळत असल्याने माझा विश्वास निश्चित असल्याचे ते म्हणाले.

या सभेला माजी मंत्री पंडीतराव दौंड, पी.एस.घाडगे, माजी नगराध्यक्ष सोमनाथअप्पा हालगे, ज्येष्ठ नेते बाळासाहेब देशमुख, डॉ.सुरेश चौधरी, किर्तीकुमार नरवणे, श्रीकांत मांडे, माजी नगराध्यक्ष दिपक देशमुख, जाबेरखा पठाण, शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, प्रा.डॉ.विनोद जगतकर, काँग्रेसचे बाबु नंबरदार, विश्वनाथ गायकवाड, वैजनाथ सोळंके, रघुनंदन खरात, मनसेचे सुमंत धस, श्रीकांत पाथरकर, दिलीप जोशी, गणपत कोरे, सोपानराव ताटे, वैजनाथराव बागवाले, गोपाळ आंधळे, अनिल अष्टेकर, गोविंद कुकर, डॉ.माणिक कांबळे, भागवत वाघमारे, फरकूंद अली बेग, रमेश मस्के, नितीन रोडे, दत्ता दहिवाळ, सय्यद सिराज, भारत ताटे, मुन्ना बागवाले, संगिताताई तुपसागर, कमलबाई निंबाळकर, के.डी.उपाडे, लालाखा पठाण आदींसह गाव भागातील आघाडीचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.
सभेचे सूत्रसंचलन नगरसेवक गोपाळ आंधळे यांनी केले.

COMMENTS