मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे. वाढती महागाई आणि इंधण दरवाढीवरुन मुंडे यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. इतके दिवस देशातील व राज्यातील जनतेची लूट केली. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जनतेची माफी मागितली पाहिजे अशी मागणी मुंडे यांनी केली आहे. जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या किंमती कमी होऊनही राज्य आणि केंद्र सरकारने भरमसाठ कर लावून जनतेची लूट केली आहे. आता केवळ अडीच रुपये कमी केले म्हणून पाठ थोपटवून घेत असल्याची टीका धनंजय मुंडे यांनी केली आहे.
. @Dev_Fadnavis महोदय, तुमच्या मुळेच पेट्रोल, डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत आणि आता दर कमी केल्याबद्दल अभिनंदन कसले करून घेता ? चार वर्षे लूट केल्यानंतर आता निवडणूका डोळ्यासमोर ठेवून दर कमी करण्याचा घेतलेला हा निर्णय म्हणजे सरकारला उशिरा सुचलेले शहाणपणच आहे. https://t.co/vRWmA1NyxE
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) October 4, 2018
दरम्यान केंद्राने अडीच रुपये कमी केले म्हणून तुम्ही अभिनंदन करता लाज वाटली पाहिजे. चार वर्षात जनतेची लूट केली. अशी जोरदारी टीका धनंजय मुंडे यांनी केली आहे. तसेच आता कच्च्या तेलाच्या किंमतीनुसार शेजारील देशात जसे दर कमी केले तसे आपल्याकडेही पेट्रोलचे दर कमी झाले पाहिजेत अशी मागणीही मुंडे यांनी आज मुंबईतील पत्रकार परिषदेत केली आहे.
COMMENTS