मुंबई – येडं पेरलं आणि खुळं उगवलं असा टोला विधानपरिषदचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना लगावला आहे. याबातचं ट्वीट मुंडे यांनी केलं असून भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी जालन्यात बोलताना विंग कमांडर अभिनंदन यांचा ‘हेलिकॉप्टरचा पायलट’ असा उल्लेख केला होता. अभिनंदन हे भारताच्या लढाऊ विमानांचे वैमानिक आहेत. त्यांच्या या वक्तव्यावर सर्व स्तरातून टीका झाली होती. यावरुनच मुंडे यांनी दानवेंना ट्विटरवरुन टोला लगावला आहे.
बे एके बे
बे दुने चार
बे त्रिक बेअक्कलयांना विंग कमांडर आणि पायलट यातला फरक कळत नाही. मिग-२१ आणि हेलिकॉप्टर यातला फरक कळत नाही आणि झालेत प्रदेशाध्यक्ष…
'येडं पेरलं आणि खुळं उगवलं' अशी गत आहे सगळी.https://t.co/RuwzxSnCJf
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) April 3, 2019
बे एके बे…बे दुने चार…बे त्रिक बेअक्कल अशा शब्दांत टीका करत येडं पेरलं आणि खुळं उगवलं अशी टीका मुंडे यांनी केली आहे.तसेच यांना विंग कमांडर आणि पायलट यातला फरक कळत नाही. मिग-२१ आणि हेलिकॉप्टर यातला फरक कळत नाही आणि झालेत प्रदेशाध्यक्ष’ असंही मुंडे यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
COMMENTS