मुंबई – चालु हिवाळी अधिवेशनात 20 हजार कोटी रूपयांच्या पुरवणी मागण्या मांडुन युती सरकारने नवा विक्रम केला असल्याचे उपरोधीत टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेता धनंजय मुंडे यांनी केली आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आज सरकारतर्फे मांडण्यात आलेल्या पुरवणी मागण्यांवर प्रतिक्रिया व्यक्त करताना ते माध्यमांशी बोलत होते.
पुरवणी मागण्या मांडायचा विक्रम या युती सरकारने मोडला आहे. राज्य आर्थिकदृष्ट्या अडचणीत असल्याचे यावरुन समोर येते. हिवाळी अधिवेशनात २० हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मांडण्यापेक्षा, राज्यसरकारने आर्थिकदृष्ट्या राज्याची स्थिती काय आहे, हे अगोदर स्पष्ट करावे – @dhananjay_munde pic.twitter.com/70PULLcyah
— NCP (@NCPspeaks) November 19, 2018
कोणताही विकास न करता राज्य कर्जबाजारी करण्याचे काम सरकारने केले आहे. 20 हजार कोटी रूपयांच्या पुरवणी मागण्या मांडाव्या लागत असतील तर हे राज्य आर्थिक दृष्ट्या संकटात सापडल्याचे लक्षण आहे. राज्यावर साडेचार लाख कोटी रूपयांचा कर्जाचा डोंगर आधीच झाला आहे. सरकारने राज्याची आर्थिक परिस्थिती नेमकी काय आहे, हे जाहीर करावे अशी मागणीही श्री.मुंडे यांनी केली.
COMMENTS