…तर महाराष्ट्राची राज्यभाषा गुजराती आणि गांधीनगर राजधानीच करून टाका – धनंजय मुंडे

…तर महाराष्ट्राची राज्यभाषा गुजराती आणि गांधीनगर राजधानीच करून टाका – धनंजय मुंडे

मुंबई – महाराष्ट्रातील अभ्यासक्रमाच्या पुस्तकात गुजरातीचे धडे छापून झाले आता मराठी शिक्षकांनाही गुजराती वाहिनीवरून धडे देण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे. शासनाचा हा निर्णय म्हणजे सरकारचा महाराष्ट्राचे संपूर्ण गुजरातीकरण आणि लांगुलचालन करण्याचा निषेधार्ह प्रकार असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलं आहे. तसेच सरकारला गुजरातीचे इतकेच प्रेम असेल तर महाराष्ट्राची राज्यभाषा गुजराती आणि गांधीनगर राजधानीच करून टाका ?  असंही मुंडे यांनी म्हटलं आहे. तसेच सरकारच्या या गुजराती आणि जिओ प्रेमाचा धिक्कार असल्याचीही मुंडे यांनी टीका केली आहे.

दरम्यान ‘वंदे गुजरात’ या गुजराती वाहिनीवरुन महाराष्ट्रातील शिक्षकांना देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. इयत्त पहिली आणि आठवीचा अभ्यासक्रम नुकताच बदलण्यात आला आहे. या अभ्याक्रमासाठी संबंधित विषय शिक्षकांना येत्या 24 ते 26 सप्टेंबर रोजी व्हर्च्युअल प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी शिक्षण विभागाने दुरदर्शनच्या मराठी ‘सह्याद्री’ वाहिनीला डावलून वंदे गुजरात या वाहिनीची निवड केली आहे. शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे धनंजय मुंडे यांनी टीका केली आहे. शासनाचा हा निर्णय म्हणजे सरकारचा महाराष्ट्राचे संपूर्ण गुजरातीकरण आणि लांगुलचालन करण्याचा निषेधार्ह प्रकार अल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

COMMENTS