हा उगवता नव्हे तर मावळता महाराष्ट्र – धनंजय मुंडे

हा उगवता नव्हे तर मावळता महाराष्ट्र – धनंजय मुंडे

मुंबई – हा उगवता नव्हे तर मावळता महाराष्ट्र झाला आहे. निवडणुकीआधी दिलेले एकही आश्वासन पाळले नाही. शेतक-यांचा ना सातबारा कोरा झाला, ना मराठा, धनगर समाजाला आरक्षण मिळाले. 1972 पेक्षा जास्त दुष्काळ असतांना सरकार गंभीर नाही. दुष्काळाची पाहणी अंधारात करून दुष्काळग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळले जात आहे, दुष्काळ असतांना काही मंत्री विदेशवा-या करत आहेत.जलयुक्त शिवार योजना यशस्वी झाली तर दुष्काळ का आला, 7500 कोटी रु कोठे गेले ? असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. न्यूज 18 लोकमतच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

भ्रष्ट्राचारमुक्त कारभाराची घोषणा केली, 16 मंत्र्यांवर भ्रष्ट्राचारावर आरोप होऊन पुरावे देऊनही क्लीन चिट देण्याशिवाय काहीच केले नाही. राज्यातला शेतक-यांपासून ते प्रत्येक घटकाला आपल्या मागण्यांसाठी संपावर जावे लागत असल्याचंही यावेळी धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातले वरिष्ठ सदस्य चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, ​सुभाष देसाई यांच्यासह धनंजय मुंडे, हर्षवर्धन पाटील, शेकापचे जयंत पाटील, भाई जगताप यांच्यासारखे विरोधी पक्षांचे नेत्यांनी भाग घेतला होता.

COMMENTS