मुंबई – आतापर्यंत सरकारने अनेक फसव्या घोषणा जाहीर केल्या त्यापैकी आणखी एक फसवी घोषणा कोर्टात उघड झाली असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने कोर्टात आज प्रतिज्ञापत्र सादर केलं त्यावर मुंडे यांनी सरकारवर टीका केली आहे. एकीकडे मराठा समाजाला आरक्षणाची घोषणा केली नंतर मेगाभरतीची जाहिरात दिली. आजपर्यंत अनेक अशा फसव्या घोषणा सरकारनं केल्यात.त्यापैकी आणखी एक फसवी घोषणा आज कोर्टात प्रतिज्ञापत्रातून उघड झाली असल्याचं मुंडे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान मुंबई हायकोर्टात मराठा आरक्षणावर झालेल्या सुनावणी सुनावणीत 23 जानेवारीपर्यंत मेगाभरतीद्वारे कोणतीही नेमणूक केली जाणार नाही अशी ग्वाही राज्य सरकारनं दिली आहे. तसंच मराठा आरक्षणासंदर्भात मागासप्रवर्ग आयोगाचा अहवाल कोर्टात सादर करण्याला सुद्धा सरकारने तत्वत: तयारी दाखवली आहे. परंतु सरकार हे बेरोजगार तरुणांना फसवत आहे अशी टीका मुंडे यांनी केली.
COMMENTS