यूपीएससी परीक्षेत यश संपादन केलेल्या बीड जिल्ह्यातील तीनही जणांचे धनंजय मुंडेंनी केले अभिनंदन !

यूपीएससी परीक्षेत यश संपादन केलेल्या बीड जिल्ह्यातील तीनही जणांचे धनंजय मुंडेंनी केले अभिनंदन !

बीड, परळी – नुकत्याच घोषित झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेच्या निकालामध्ये बीड जिल्ह्यातील मंदार पत्की, वैभव वाघमारे व डॉ. प्रसन्न लोध या तीन तरुणांनी यश संपादन केल्याबद्दल पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी अभिनंदन केले आहे. मुंडे यांनी तीनही भावी अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून तसेच ट्विटर द्वारे तिघांचेही कौतुक करत शुभेच्छा दिल्या आहेत.

बीड जिल्ह्यातील सर्वसामान्य कुटुंबातील तरुण यूपीएससीला गवसणी घालत आहेत ही अत्यंत अभिमानाची बाब असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. तसेच आपल्याला मिळणाऱ्या पदाचा वापर करून देशहितार्थ योगदान देण्यासाठी तिघांनाही शुभेच्छा दिल्या आहेत.

सप्टेंबर २०१९ मध्ये झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेत बीड येथील मंदार पत्की देशात २२ वा, डॉ. प्रसन्न लोध ५२४ तर अंबेजोगाई येथील वैभव वाघमारे ७७१ रँक प्राप्त करून यशस्वी झाले आहेत.

COMMENTS