परळी – परळी शहरातील माळी समाज बांधवांच्या संत श्रेष्ट सावता महाराज मंदिराच्या पार्कींगच्या जागेचा प्रश्न विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सोडवला असून, पार्कींगसाठी मंदिरासमोरील 2200 चौरस फुट जागा स्वखर्चाने खरेदी करून मंदिर समितीला देण्याचा निर्णय घेतला आहे, त्याबद्दल माळी समाजाच्या वतीने धनंजय मुंडेंचा सत्कार करून आभार व्यक्त करण्यात आले.
शहराच्या गाव भागात असलेल्या संत श्रेष्ट सावता महाराज मंदिरात वर्षभर विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात, या कार्यक्रमांसाठी भाविक, भक्तांची, नागरिकांची मोठी गर्दी होते, मात्र मंदिराला पार्कींगची जागा उपलब्ध नसल्याने वाहन व्यवस्थे अभावी येथे येणार्या नागरिकांची गैरसोय होत असते. मंदिराच्या पार्कींगची ही समस्या सोडवण्याचे आश्वासन धनंजय मुंडे यांनी समाज बांधवांना दिले होते, त्याची पुर्तता करण्यासाठी त्यांनी स्वःताच्या खर्चाने मंदिरा समोरील 2200 चौरस फुट जागा खरेदी केली असून, ती लवकरच मंदिर समितीच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
शहरातील सकल माळी समाजाच्या वतीने मंदिराच्या पार्कींगचा प्रश्न सोडवल्याबद्दल श्री.मुंडे यांचा शुक्रवारी सायंकाळी सावता माळी मंदिरात झालेल्या कार्यक्रमात सत्कार करून आभार व्यक्त करण्यात आले.
या कार्यक्रमास माजी नगरसेवक तथा समाजातील ज्येष्ठ प्रा.नरहरी काकडे सर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण पौळ, शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, गटनेते वाल्मिकअण्णा कराड, माजी नगराध्यक्ष दिपक देशमुख, नगरसेवक गोपाळ आंधळे, राजकुमार डाके, माजी नगरसेवक सुदामराव लोखंडे, सुरेश नानवटे उपस्थित होते.
समाज बांधवांच्या प्रत्येक अडी-अडचणीच्या काळात आपण सदैव तत्पर राहु त्यासाठी काम करणार्या माणसाच्या पाठीशी साथ आणि आशीर्वाद द्या असे आवाहन यावेळी धनंजय मुंडे यांनी बोलताना केले.
कार्यक्रमास सचिन आरसुडे, प्रल्हाद लोखंडे, गोपीनाथ लोखंडे, बालाजी काळे, बळीराम नागरगोजे, हनुमंत आगरकर, धोंडीराम वडुळकर, शंकरअप्पा लोखंडे, अर्जुनराव शिंदे, उध्दव गोरे, अरूण शिंदे, सुधाकर शिंदे व समाजा बांधव, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
COMMENTS