धनंजय मुंडे यांनी बहुचर्चित  परळी – अंबाजोगाई रस्त्याचा प्रश्न लावला मार्गी !

धनंजय मुंडे यांनी बहुचर्चित  परळी – अंबाजोगाई रस्त्याचा प्रश्न लावला मार्गी !

बीड, परळी – परळीच्या नागरिकांच्या अत्यंत आवश्यकतेचा व जिव्हाळ्याचा बहुचर्चित विषय ठरलेल्या  परळी ते अंबाजोगाई रस्त्याच्या कामाला गती देऊन रस्ता  रखडल्याने नागरीकांना होणाऱ्या त्रासातून आता मुक्तता होणार आहे. हे काम  दर्जेदार व जलद गतीने  होण्याच्या दृष्टीने राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीडचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी परळी -अंबाजोगाई रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला आहे.

या राष्ट्रीय महामार्गाचे ना.  धनंजय मुंडे यांच्या हस्ते शनिवार दि.  २५ जानेवारीला भूमिपूजन होणार आहे.

मौलाना आझाद चौक, परळी ते धायगुडा पिंपळा अंबाजोगाई  जवळपास 18.50 कि.मी.रस्त्याचे काम रखडले होते. या कामासाठी ए. जी. कन्स्ट्रक्शन व राजेंद्रसिंग भल्ला इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. औरंगाबाद यांची कंत्राटदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक. 548 ब चा भाग असलेला हा रस्ता जलदगतीने पूर्ण होणार आहे.

99.99 कोटी रुपये किंमतीत हे काम होणार असून या कामासाठी 18 महिन्याची कालमर्यादा घालून देण्यात आली आहे. या प्रकल्पात १००० मिटर रुंदीचा सिमेंट काँक्रिट रस्ता, तसेच दुचाकी वाहनांसाठी रस्त्याच्या दोन्ही बाजुंनी १.५० मीटरचा स्वतंत्र रस्ता होणार आहे.

गावभागातून जाणाऱ्या रस्त्यावर आवश्यकतेप्रमाणे चौपदरीकरण,  दुभाजक, पथदिवे, काँक्रिट गटार यांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे गुरे,बैलगाडी यांना रस्ता ओलांडून जाता यावे आणि  शेतीसाठी कनेक्शन घेणे आदी बाबींसाठी पाईपलाईन  व इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आवश्यकतेप्रमाणे पुल, बसमार्गिका व बसथांबे बांधकाम  होणार आहे.

तत्कालीन सबंधीत कंञाटदार यांनी कसल्याही प्रकारच्या तांञिक बाबी पुर्ण न करता हे काम रखडून टाकले होते. या रस्त्यावरून दैनंदिन होणाऱ्या वहातुकीसाठी रस्त्याच्या ञासामुळे  नागरीक हैराण झाले होते. या रखडलेल्या रस्त्याचे काम दर्जेदार होत नाही व या कामा बाबत कसल्याही प्रकारचे तांञिक व्यवस्थापन नाही. अशी मोठ्या प्रमाणावर ओरड झाली तसेच नागरिकांनी आंदोलने केली होती.

हे  काम तांञिक बाबी व प्रवाशांचे लक्षांचे हित लक्षात घेवून काम तात्काळ जलद गतीने व दर्जेदार स्वरूपात सुरू करावे यासाठी ना. धनंजय मुंडे यांनी सुरुवाती पासूनच प्रयत्न केले. अखेर  ना. धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे  परळी-अंबाजोगाई रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला असून शनिवार दि. २५ जानेवारीला सायंकाळी ५ वा. मौ. आजाद चौक परळी येथे या राष्ट्रीय महामार्गाचे ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे.

हा अतिशय जिव्हाळ्याचा बहुचर्चित विषय मार्गी लागत असल्याने नागरीकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

COMMENTS