मुंबई – बीडमधील परळी मतदारसंघात भाजपच्या पंकजा मुंडे यांचा पराभव झाला असून राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय मुंडे यांचा विजय झाला आहे. 17 व्या फेरीत धनंजय मुंडे 28116 मतांनी आघाडीवर राहिले आहेत.
या पराभवानंतर पकजा मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून जनतेचा कौल मला मान्य असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर विजयानंतर धनंजय मुंडे यांनीही ट्वीटरवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. विजयानंतर पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषदेत जनतेनं दिलेला कौल मान्य असून पराभव स्वीकारत असल्याचं सांगितलं आहे. तर दुसरीकडे धनंजय मुंडे यांनी ट्विटरवरून फक्त दोनच शब्दांत आपली प्रतिक्रिया दिली आहे. धनंजय मुंडे यांनी सत्यमेव जयते असं म्हटलं आहे.
सत्यमेव जयते!
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) October 24, 2019
दरम्यान दोन बहीण भावांच्या या लढतीकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. त्यातच मतदानाच्या दोन दिवस आधी, धनंजय मुंडे यांच्या वादग्रस्त वक्तव्याची एक क्लिप व्हायरल झाली होती. त्यावरून मोठा राजकीय वाद उफाळून आला होता. त्यामुळे ही निवडणूक आणखीनच लक्षवेधी ठरली होती. परंतु या भावनिक राजकारणावर मात करत धनंजय मुंडे यांनी बाजी मारली आहे.
परळीमध्ये 2014 च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंचा पराभव केला आणि त्या मंत्री झाल्या होत्या. आता 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा पंकजा मुंडेंची प्रतिष्ठा पणाला लागली होती. परंतु यावेळी मात्र धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर मात करत दणदणीत विजय मिळवला आहे.
COMMENTS