मुंबई – विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाजप सरकारवर पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे. पुण्यातील भारतीय जनता पार्टीचे आमदार योगेश टिळेकर यांच्यावर कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये खंडणी मगितल्याप्रकरणी मागील आठवड्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा दाखल केल्यामुळे पोलिस निरीक्षक मिलिंद गायकवाड यांची पुणे पोलिसांच्या विशेष शाखेत बदली करण्यात आली. या बदलीमुळे पुण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणावरूनच मुंडे यांनी जोरदार टीका केली आहे.
घोटाळ्यात बुडालेल्या मंत्र्यांना क्लीनचिट तर देताच होतात पण कायदेशीर कारवाई करणाऱ्या कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्यांवरच कारवाईचा बडगा? कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे हे राज्यकर्त्यांचे आद्यकर्तव्य असते.हीच का तुमची पार्टी विथ डिफरन्स ? @Dev_Fadnavis
https://t.co/ofuhZWb4DJ— Dhananjay Munde (@dhananjay_munde) October 19, 2018
याबाबतचं ट्वीट धनंज मुंडे यांनी केलं असून ‘घोटाळ्यात बुडालेल्या मंत्र्यांना क्लीनचिट तर देतच होतात पण कायदेशीर कारवाई करणाऱ्या कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्यांवरच कारवाईचा बडगा? कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे हे राज्यकर्त्यांचे आद्यकर्तव्य असते. हीच का तुमची पार्टी विथ डिफरन्स?’ असा सवाल मुंडे यांनी मुख्यमंत्र्याना केला आहे.
COMMENTS