आरक्षणाच्या मागणीवरुन धनगर समाज आक्रमक, पुण्यातील कार्यालयात तोडफोड तर कोल्हापूर, सोलापुरात मोर्चा !

आरक्षणाच्या मागणीवरुन धनगर समाज आक्रमक, पुण्यातील कार्यालयात तोडफोड तर कोल्हापूर, सोलापुरात मोर्चा !

मुंबई – आरक्षणाच्या मागणीवरुन धनगर समाजानं आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्यात ठिकठिकाणी आंदोलन केलं जात असून आरक्षणाच्या मागणीवरुन पुण्यातील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेत दोन तरुणांनी तोडफोड केली. धनगर समाजाला आरक्षण देण्याची मागणी करणारे पत्रक भिरकावत आणि भंडारा उधळून त्यांनी आरक्षणाच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. तसेच या दोन्ही तरुणांनी खुर्च्यांची तोडफोडही केली असल्याची माहिती आहे.

दरम्यान धनगर समाजाचा समावेश एसटी प्रवर्गात व्हावा यासाठी कोल्हापूर जिल्हा धनगर संघर्ष समितीच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला यावेळी पाच युवतींनी सरकारला जाग आणण्यासाठी आपली मनोगते व्यक्त केले. तसेच सोलापूरमध्येही धनगर बांधवांनी मोर्चाचं आयोजन केलं होतं. या मोर्चाला जिल्ह्यातील आणि राज्यातील अनेक कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती.

 

 

COMMENTS