धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी आज राज्यभर आंदोलन !

धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी आज राज्यभर आंदोलन !

अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्त आज राज्यभर धनगर समाजाकडून  आरक्षणबाबत आंदोलन करण्यात येणार आहे. राज्यात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर दिवसभर धरणं धरले जाणार आहे. तसंच विविध ठिकाणी धनगर समाजाचे मोर्चे, सभांचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा संघटनांप्रमाणे धनगर समाजाच्या संघटनांमध्ये एकवाक्यता नाहीये. त्यामुळे समजाच्या विविध नेत्यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्रपणे वेगवेगळ्या ठिकाणी हे आंदोलन केले जाणार आहे.

लातूरमध्ये लिंगायत समाज आंदोलन करणार आहे. वेगळ्या धर्माच्या मागणीसाठी हे आंदोलन केलं जाणार आहे. तहसील कार्यालयासमोर इष्टलिंग पुजा करुन हे आंदोलन केले जाणार आहे. मराठा आंदोलनानंतर हे आंदोलन आता आक्रमक होण्यची चिन्हं आहेत. त्यामुळे सरकारपुढील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

COMMENTS