रास्तारोको आंदोलनादरम्यान एसटी बसची धनगर समाजाकडून पूजा, परिवहनमंत्र्यांनी मानले आभार !

रास्तारोको आंदोलनादरम्यान एसटी बसची धनगर समाजाकडून पूजा, परिवहनमंत्र्यांनी मानले आभार !

मुंबई –  जामखेड फाटा येथे धनगर समाजाने त्यांच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करताना रस्त्यात आलेल्या एसटी बसची पूजा करुन तिला विनाअडथळा पुढे जाऊ दिले. आंदोलन करताना सर्वसामान्य जनतेच्या सार्वजनिक वाहतुकीचा आदर करण्याची आंदोलकांची ही कृती आदर्शवत असून याबद्दल आपण आंदोलकांचे आभार मानतो आणि त्यांचे अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिली आहे.

दरम्यान जामखेड फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करताना आलेल्या एसटी बसची आंदोलकांनी पूजा केली. एवढेच नव्हे तर आंदोलकांनी चालक आणि वाहकाचा सत्कार केला. गोरगरीब आणि सर्वसामान्य लोक वापरत असलेल्या सार्वजनिक वाहतुकीबद्दल आंदोलकांनी व्यक्त केलेला हा आदर फार महत्वाचा आहे. धनगर समाज बांधवांनी आजच्या आपल्या कृतीतून आंदोलनासंदर्भात वेगळा आदर्श घालून दिला आहे, अशी प्रतिक्रीया मंत्री श्री. रावते यांनी दिली आहे.

COMMENTS